पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ ज्यापासून आपणास सुख होते किंवा होईल अथवा ज्या पासून आपणास फायदा आहे अथवा मनास. आनंद होईल तेथें प्रीति उत्पन्न होते. त्या सुखाची किंवा फायद्याची आशा नष्ट होतांच तो प्रीतीचा झरा बंद होतो. परस्पर मतलबाची प्रीति कारणापुरती बळेंच व अतिशय जी दाखविण्यांत येते तिचा कार्या नंतर एकदम नाशही होतो. ४ शुद्ध प्रेमाची प्रीति मात्र कायम रहाते. कारण परस्पराच्या सुख दुःखाचा परिणाम परस्परावर अवलंबून असतो. ५ प्रेमाची प्रीति संयोगकाळी जितकें सुख देते तितकें वियोगा .च्या वेळेस दुःखास कारण होते. ६ प्रीति ह्मणजे माया यास्तव तिचे मूळच दुःखांतून उत्पन्न झालेले आहे. यास्तव तिचें फळ किंवा परिणामही दुःखकारक होणार आहेत. प्रेमाच्या प्रीतीत एकनिष्ठा व दृढ निश्चय याशिवाय मनास सुख वाटेल अशी दुसरी कोणतीही वस्तु सांपडावयांची नाही. परग्रहवास. १ परगहवास ह्मणजे ज्या ठिकाणी आपला हक्क नाही. सत्ता नाही अशा ठिकाणी आपल्या गरजेस्तव अथवा दुसऱ्याच्या तंत्राने वागणे भाग आहे यास्तव होंगे. दुसऱ्याच्या घरी राहिल्याने त्याच्या तंत्राने आपणास वागावें लागते, आपली स्वतंत्रता नष्ट होते, ह्मणजे आपणास लघुत्व प्राप्त होते. कारण तो दाता व आपण याचक असें ठरलो.