पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ वाईटाचा परिणाम आपणास भोगावा लागणार आहे, हे लक्षात ठेविले पाहिजे. स्वतः च्या अनुभवाने किंवा अक्कलेने न करता दुसऱ्याच्या तंत्राने जे काही करण्यांत येते, त्याचा परिणाम आपण फसले जाऊन आपल्या हातून अनर्थ घडतात हा होतो. परंतु अनर्थ होण्याच्या आगोदर आपणास कळत नाही किंवा आपले डोळे उघडत नाहीत, व तो झाल्यावर आपण ज्याच्या सल्याने हे काम केले त्याला दोष देण्यास तयार होतो किंवा आरंभ करतो ह्यामुळे आपली जास्त फजीती व नुकसान होते. परक्याच्या तंत्राने वागल्याने ज्या वेळेस आपण पेचांत येतों त्या वेळेस ते आपली सुटका करण्यास येत नाहीत. पण आपल्या मूर्खपणाबद्दल आपल्या निंदेचे पवाडे मात्र घरोघरी गात फिरतात. परमेश्वराने आपणास ऐकण्यास कान, पाहाण्यास चक्षु, विचार करण्यास ज्ञान दिले असून त्याचा उपयोग न करतां, ह्मणजे परमेश्वराची अवज्ञा करून, अज्ञानां सारखे निर्बळ होऊन दुसऱ्याच्या तंत्राने वागून आपला नाश करून घेऊन पुढे पश्चात्ताप करीत कां बसावे ? प्राति. अंतःकरणाच्याठायीं ज्याचा वियोग दुःखकारक वाटतो व त्याचा संयोग आनंदास कारण होतो.