पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१. कारण आचार भिन्नता आहे. जसे एखाद्याशी आपले खानगी रीतीनेही वांकडे असले तर आपण त्याच्या येथले पाणीही ग्रहण करित नाही, कारण ज्या आचाराचा अथवा रीतीचा आपणास तिरस्कार आहे त्या आचार व रीतीस अनुसरून वागणारा जवळ आपले कसे पटेल? एकंदरीत परधर्मापासून भिऊन दूर असावे व आपल्या धर्माचें संरक्षण करावें. आणि तसेंच परधर्माची निंदा किंवा तिरस्कार ही करूं नये. सर्व धर्माच्या लोकांशी नम्रतेने वागावे. सर्व प्राणि ईश्वराचे आहेत यास्तव सर्वांवर दयादृष्टि ठेवावी. कोणाशी वैर उत्पन्न होईल अथवा कोणास वाईट वाटेल असे वर्तन करूं नये. कान नाही पण सान. कान नाही पण सान ह्मणजे कोणतीही गोष्ट करणे, किंवा कोणाविषयी मत बांधणे अथवा कोणतेही कार्य करणे तें स्वतःच्या कानाने ऐकून किंवा स्वतः अनुभव घेऊन किंवा विचार करून करावयार्थ त न करतां ज्या प्रमाणे दुसरा ( जवळचा ) सांगेल किंवा अभिप्राय देईल त्या प्रमाणे करणे अथवा वर्तणे. दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा अभिप्रायाप्रमाणे आपण जे काही कार्य करतो किंवा ज्या प्रमाणे वर्ततों त्याची जोखीम त्या मनुष्यावर नसून आपल्यावर आहे. व त्याच्या बऱ्या