पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० लहरीत मनुष्याच्या कृत्यावर कोणाचा विश्वास नसतो. लोकांत त्यांचे वजन नसते त्यांचे कार्य सिद्धिस जात नाही. आणि लोक पाठिमागे त्याला हंसतात व त्याची थट्टा मात्र करतात. परधर्म १ परधर्म किंवा दुसऱ्याचा धर्म म्हणजे आपल्या मताविरुद्ध आपल्या रीतीच्या उलट आपल्याला पसंत किंवा सोइवार नाही असा धर्म. परधर्माची निंदा करू नये. कारण तो जरी आपणास पमंत नाही किंवा सोईवार नाही तरी तो परलोकवास म्हणजे जो त्याधर्माचा आहे त्यास हीतकर आहे. तर आपणास ज्यापासून नफा नाही परंतु त्यापासून दुसऱ्यास फायदा आहे. यास्तव त्याची निंदा करणे ही ईषों किंवा हलकट बुद्धि नव्हे का ? ३ परधर्माच्या लोकांसही साह्य करावे व त्यांच्या दुःखाकडे ही दयाई अतःकरणाने पाहावे. कारण असे न केले तर त्यांना (पर धमीना ) जो माग हितकर नाही. त्यांत त्यांना गमन करण्याची फर्ज पाडणे किंवा इच्छिणे नव्हें कां ? धर्म सर्व मनुष्यप्राण्याचे एक आहेत; [ दया, क्षमा, शान्त, मर्यादा, धैर्य, दमन, ज्ञान, नम्रता, उपकार ] परंतु हे पाळण्याची रीत किंवा आचार भिन्न आहेत. ह्यामुळे परस्पराचा मतांत विरोधता उत्पन्न होऊन परस्पराविषयी अल्प बुद्धि जनाचा तिरस्कार उत्पन्न झालेला असतो. परस्पर भोजन नसण्याचे