पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्यावर लवत नाहीत किंवा अति कठिण पडते. त्याप्रमाणे बुद्धीची वाढ आटपल्यावर ति लंवू शकत नाही. चांगला स्वभाव ठेवावा हे प्रत्येक मनुष्याच्या हितास कारण होय. लहर. लहर म्हणजे मनाचा कल, झोंक, वळण किंवा परिणामाच्या विचारा शिवाय मनाची इच्छा अथवा अखेरीवर धोरण ठेवल्या शिवाय कोणतेही कार्य करण्यास तैयार होणे किंवा आरंभ करणे म्हणजे मनांतून आपण निस्पृही निष्काळजी आहोत व आपली वर्तणूक वेपर्वाईची आहे. असे लोकांस दाखविणे. अर्थात् आपण इतके मूर्ख आहों अशी लोकांची खात्री करण्यास इच्छि णे. आश्चर्य किती मूर्खपणा? २ लहरीत जे कार्य मनुष्य करतो ते चुकीचे म्हणजे अपायकारक असते. कारण त्या वेळेस तो एक प्रकारच्या तारेत ( निशे सारखा ] असतो. ३ ज्या वेळेस लहरींत मनुष्य आपला मोठेपणा लोकांस दाखवि. ण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस लोकांच्या मनांत मात्र तो ज्यास्त हलका व मूर्ख ठरतो लहरीत मनुष्य आपला मोठेपणा दाखविण्यास व्यर्थ खर्चात येतो, लोक त्याला चढवितात. अखेरीस तेच त्याची फजेती करतात.