पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जवळ करितो, ह्यामुळे त्याचा बोज न रहातां हलक्या मनुष्या कडून त्याचा वारंवार अपमान होतो. लोभ लोम ह्या शब्दाचा अर्थ स्वतःस पाहीजे, ह्या पेक्षा किंवा आपण योग्य रीतीने मिळवू शकू त्यापेक्षा अधिक मिळविण्याची किंवा असण्याची इच्छा. २ अशी अधिक मिळविण्याची इच्छा ह्मणजे लोभ, हा पार पाडण्याकरितां आपल्याला कोणता तरी वाईट मार्ग स्वीकारिला पाहिजे. वाईटमार्ग स्वीकारिल्याखेरीज लोभ पार पडत नाही; आणि वाईट मार्गाने चालल्याने आपण परमेश्वराचे अपराधी होतो. ४ लोभाने आपणास आपले मानपान सोडून द्यावे लागतात. ५ लोभाने आपला तिरस्कार होऊन बोज नाहीसा होतो. ६ ज्या लोभाकरितां आपण कुमार्ग पतकरितों, तो लोभ बहुतकरून पार पडत नाही. ७ लोभाने काळजी व पश्चात्ताप अवश्य उप्तन्न होतात. ८ लोभाने मनुष्याच्या अंगी अन्नही लागत नाही. लोभामुळे वाईट कृत्यांनी मिळविलेल्या धनाचा कोणीही सुखोपभोग केला आहे, असे आजपर्यंतच्या इतिहासावरून आढळत नाही. १० लोभ नकरावा ह्याचा अर्थ फाजील खर्च करावा, किंवा पैसा संग्रही न बाळगावा, अथवा आपल्या घरइस्टेटसंबंधी, किंवा आपल्या फायद्यासंबंधी निष्काळजी रहावे असा समजं