पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो नुसता कबूलही करित नाही, कारण त्याला वाटते की कबूल केल्याने आपल्यास हलकेपणा येईल, यामुळे परिणामी वाईट रीतीने त्याचा नाश होतो, तेव्हां गर्व न करणे हेच बरें नव्हे काय ? मत्सर, १ मत्सर ह्या शब्दाचा अर्थ आपण न करितां दुसऱ्याने केलेले ही सहन न होणे. २ मत्सराने मनुष्य आपलाच नाश करितो. ३ मनांत मत्सर आल्याने जिभेनें निंदा मात्र होते. ४ जिभने निंदा केल्याने लोक आपल्याला अज्ञान समजात. ५ मत्सराने आपल्या जिवाला मात्र त्रास होतो. ६ मत्सरापासून तिरस्कार, आणि तिरस्कारापासून द्वेष उत्पन्न होतो आणि द्वेशा पासून संताप होऊन अखेरीस पश्चात्ताप होतो. ७ मत्सरी पुरुषांपासून कोणतेही काम निदेशिवाय होत नाही. ८ मत्सराने मन शुद्ध रहात नाही. ९ जो मनुष्य मत्सर करितो त्याला आपल्या स्वतःच्याने काही काम होत नाही, ह्या बद्दल लाज वाटत नाही. १० मत्सरीमनुष्याला सर्वच उलटे दिसते. ११ मत्सरीमनुष्याला पराक्रमी शत्रु वाटतो. १२ मत्सरीमनुष्य दुसऱ्याची निंदा आपल्याहून हलक्या मनुष्या