पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

D ३ होते. कोणाला सारखी संगत मिळत नाही. त्यांत कांही तरी न्यूनाधिकता असते हेच भिन्नभिन्न प्रकृत्तिस कारण होय. ज्या ज्याप्रमाणे संगत पालटत जाते त्या त्याप्रमाणे प्रकृति ( बुद्धि ) ही पालटत जाते; परंतु मूळ संगतीचे बीज ज्या प्रमामें वस्तचा नाश झाल्याशिवाय किंवा तिचे स्वरूप बदलत नाही. तद्वत् नाश पावत नाही अथवा अगदी स्वरूप बदलून टाकित नाही. ह्याच्याच गार्भत अर्थ श्रेष्ट कुलोत्पन्नास प्रसंग पाडण्यांत आहे. आपल्या बऱ्या किंवा वाईट स्वभावाची परक्षिा आपल्यापेक्षा इतरास लवकर होते. ह्याचे कारण आपल्या स्वभावाची असर आपल्यापेक्षा इतरास प्रथम होते ह्यामुळे आपल्या आचरणाने [ ज्याप्रमाणे स्वभाव असेल तसेंच आचरण करण्यांत येते. ] दसऱ्यावर काय परिणाम झाला ह्याचा विचार व तपास करून आपले आचरण [ स्वभाव ] सुधारण्याचा प्रयत्न करावा. ( ह्या अर्थाचा समावेश जगताकडे लक्ष द्यावे ह्यांत आहे.) आपल्या स्वमावाप्रमाणे आपले आचरण असते व आपल्या आचरण वर आपलें सुख दुःख अवलंबून असते यास्तव आपला सस्वभाव करण्याचा हळहळ सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. जापर्यंत बुद्धीला जडत्व [ स्थिरता किंवा पुढे वाढण्याच्या गतीचे मंदत्व ] आले नाही तोपर्यंत संगतीची असर लवकर होउन स्वभाव पालटु शकतो. [ ह्यालाच बाळकाळ म्हणतात ] कारण ज्याप्रमाणे हाडे मनुष्याच्या आंगांत पूर्ण वाढीस आ