पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११७ हीन आणि दीन आहे. यास्तव त्याला आपल्याच्यानें बनेल तर ती वस्तु पुरी पाडणे ह्मणजे त्याची ती उणीव भरून काढणे ह्याला परमार्थकृत्य ह्मणतात. ह्याची उत्पत्ति दयेपासून ह्मणजे सर्वांस सुख असावे अशी जी बळकट इच्छा तीपासून होते. ज्याला वस्तूची उणीव असेल त्याला ती पुरी पाडण्यांत आली म्हणजे त्याला त्या बद्दल आनंद होऊन ती पुरी पाडणाराविषयी त्याच्या मनांत पूज्य बुद्धि उत्पन्न होते व त्याचे तो कल्याण इच्छितो. जगास हा मनुष्य प्रिय व उपयोगी वाटतो यास्तव लोकांकडून त्याला मान देण्यात येतो. दुसऱ्याच्या उणवि भरून काढणारास आपण त्याच्या सुखास कारण आहों असें वाटून दुसऱ्याची उणीव भरून काढण्यांत जे त्याला नुकसान झालेले असते त्याच्या बदल्यांत त्याच्या मनांत आनंद व संतोष उत्पन्न होतो. म्हणजे त्याने त्याच्या बदल्यांत आनंद व संतोष विकत घेतला असे नव्हे का ? अपंगास साह्य करणे हा आपला धर्म आहे. कारण परमेश्वराने आपणांस शक्ति दिली आहे. यास्तव तिचा त्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजे सदुपयोग न केला तर आपण अपराधी होणार नाहीं कां? स्वभाव. स्वभाव म्हणजे आपली वासना, इच्छा, मनोवृत्ति किंवा प्रकृति. जितक्या प्राण्यांच्या आकृति आहेत तितक्या प्रकतिही आहेत; कारण जसी संगत प्राप्त होते त्याप्रमाणे प्रकृति उत्पन्न