पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५. नीतिमान, सज्जन व विव्दान् तसेंच स्वदेशाभिमानी ह्यांस स भा जन्म देते. ६ अध्यक्षाशिवाय सभेची व्यवस्था बिन नायकाच्या फौजेसा रखी होते. ७ सभेला अध्यक्ष पोक्त, विव्दान्, नम्र, व चलाख असा असला पाहिजे. सभेत कोणचाही अपमान न होऊ देणे, कोणालाही उध्दटपणाने न बोलू देणे आणि एकतर्फी ठराव होऊ न देणे, सवास यथान्याय मोकळीक देणे, व सर्व कार्याची दक्षतेने मिसल लावणे हे अध्यक्षाचे मुख्य धर्म होत. सभेत भाषण करण्यांत फाजील वेळ न गेकणे, मधुर बोलणे बोलण्यांत श्रोतृजनांचा तिरस्कार न करणे हळूच युक्तीने व नम्रपणाने दोष दाखविणे, सर्वाला समजेल असें अस्खलीत व धिमेपणाने बोलणें हैं भाषण कर्त्यांचे धर्म आहेत. १० सभेच्या कामास मदत करणे व सभेचे हेतु तडीस जाण्यास श्रम घेणे हे स्वदेशाभिमानी पुरुषाचे कर्तव्य आहे. . ११ सभेत जे ठराव होतील ते सभेच्या उत्पादकांनी तसेंच अनु यायांनी पाळिले पाहिजेत. कारण आपल्या कल्याणार्थ ज्या योजना काढिल्या त्यांचा आव्हेर करणे. म्हणजे मुख्य सत् कृत्यावर कुठार मारिली असे होणार नाही काय ? " १२ सभेत जो ठराव होईल तो सर्वांना सारखा फायदेकारक असावा. १३ सभेत खानगी संबंध आडवा आणून तिचे कामास व्यत्यय आणू नये.