पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ व लहानास ( अज्ञानास) त्याप्रमाणे आचरण करण्यास भाग पाडणे हा आपला धर्म होय. ह्या वरून संगत ही आपल्या आचरणास मूळ कारण होय, व आपल्या परिणामास किंवा स्थितीस आपले आचरण कारण होय ह्यामुळे आपली बरी किंवा वाईट स्थिती असण्याचे मूळ कारण संगत झाली, तर आपली बरी स्थिती असण्यास संगत ( ज्ञान ) चांगली असली पाहिजे. यास्तव सर्वांनी [ जे स्वतःचे कल्याण व्हावे असे इच्छित असतील त्यांनी ] सुसंगत करावी. म्हणजे आपोआप आपलें वर्तन सदाचरणाचे होत जाते व त्यामुळे आपली उन्नती होते. सभास्थानी कर्तव्य. सभा ही दुःख निवारून सुखाभिवृद्धिचा प्रयत्न करण्याचे म हान साधन होय. २ सभा सत्कृत्यासाठीच असते, बहुमत हा तिचा पिता म्ह णजे उत्पादक आहे. ३ सभेत कोणी आपल्या विरुद्ध बोलले तर त्याविषयी तिरस्कार किंवा द्वेष करूं नये; कारण जर प्रतिपक्षाचे बोलणे योग्य असेल तर आपले मत व्यर्थ अपायकारक होईल. परंतु सदहुचे म्हणणे जर अयोग्य असेल तर आपण मोठ्या शांतपणाने सत्यतेचे उल्लंघन न करितां त्याचे खंडण करावें. जेथे विद्वानांचे सभेचा वास असतो तेथें दांभिक धर्माधिकारी, जलमी अधिकारी, व कुटिलकर्म करणारे उघडे पडतात,