पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्यामुळे त्याला जसा मार्ग [ संगत ] मिळते तसा तो [ आत्मा किंवा आपण ] गमन [ वर्तन किंवा आचरण करतो ] टीपजसे तलावाच्या पाण्याला कोठे जावें हे माहीत नाही; परंतु ज्या बाजूने बांद फुटून रस्ता मिळतो तिकडे त्याचा प्रवाह जातो. आपणास जशी संगत होते तदनुरूप आपण आचरण करितों. ह्यावरून सुसंगत झाली तर आपणास सदाचरणाने वागणार व कुसंगत झाली तर आपण दुराचरणाने वर्तणार व जसे आपण आचरण करणार त्याप्रमाणे आपणावर त्याच्या ( आचरणाच्या ) परिणामाचा दृढ ठसा होणार आहे. व जशी आपणावर त्याची ( आचरणाची ) उमट होईल ( सुखकर किंवा दुःखकार ) त्याप्रमाणे ते आचरण हितकर किंवा अहितकर आहे. ह्याचे आपणास ज्ञान होईल. व हितकर किंवा अहितकर ह्याचे ज्ञान झाल्यामुळे ज्या ज्ञानान ( संगतीने ) आपण असें आचरण केले ते ज्ञान ( संगत ) बरे किंवा वाईट ह्याचा ठसा आपल्या मनावर उमटणार आहे. टीप-लहान मुलास संगत चांगली पाहिजे असें जें मत आहे, त्याचा अर्थ त्याला सुसंगतीला लावा; कारण त्याला बऱ्या वाईटाचे ज्ञान नसते. व आपणास (मोठ्या माणसास) त्याच्या ( संगतीचा) परिणाम माहीत असल्यामुळे त्याचे ज्ञान झालेले असते. व आपणास ज्ञान झालेले असल्यामुळे हयगय किंवा बेपर्वाई न करितां जी संगत अनुभव किंवा ज्ञान हितकर असा आपल्या मनावर ठसा उमटलेला आहे. त्याप्रमाणे आचरण करणे