पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करूं नये किंवा भिऊन आपली वर्तणूक बदलून होला हो करण्यास तयार होऊ नये. कारण तसे केल्याने लोकांत आपल्या विषयी हलका विचार उत्पन्न होऊन आपला बोज उठून जातो. परंतु अयोग्य किंवा गैर समजुतीनें उत्पन्न झालेल्याला अपवादास न डगमगता आपलें चोख वर्तन कायम ठेवले तर परिणामी आपल्या श्रमाची बूज होऊन लोकांच्या मनावर आपल्या शहाचा पगडा बसून त्या बरोबर आपल्या विषयी पूज्यबुद्धि त्याच्या मनांत उप्तन्न होते. मान ह्मणजे आपणा विषयी लोकांच्या मनांत पूज्यबुद्धि उत्पन्न होण्यास आपणास श्रम, धन, बुद्धि ह्यांची घस घेऊन व पीडा किंवा दुःख सहन करून देशहिताचें कामी झटावे लागते व धनाहून मानाची किंमत विशेष आहे. कारण मान ह्मणजे कीर्ति किंवा बोज असला तरच अपण धन मिळवू शकतों व दुसरे आपल्या पाठीमागे आपणास उपयोगी अशी वस्तुमान ह्मणजे आपणाविषयी लोकांच्या मनांत पूज्यबुद्धी हिच आहे. संगत. १ संगत ह्मणजे भेट किंवा प्रत्यक्ष व्यवहार [ प्रसंग ] अथवा प्रत्यक्ष अनुभव किंवा ज्ञान होणे. आपणांस ( आत्म्यास ) प्रथम कोणत्याही प्रकारचे काहीच ज्ञान नसते. परंतु तो ( आत्मा ) स्थिर नसतां चंचळ आहे.