पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१११ मान अपमान. मान ह्मणजे आपण जे सत्कर्म किंवा चांगले काम किं ज्यापासून अयोग्य कोणास हरकत न होतां आपलें दुसऱ्याचे किंवा सर्वीचे व विशेष करून अनाथाचे कल्याण होईल असें, व त्यामुळे दुसऱ्याच्या मनांत आपणा विषयी जी पूज्यबुध्दि उत्पन्न झाली व तिच्या योगाने ते आपणाशी नम्रतेने वर्ते लागले व मनापासून आपले कल्याण व्हावे असे चिंतू लागले, ह्या योगाने आपल्यास सद्वर्तणुकीचेच हे फळ आहे, असे आपल्या मनास वाटून जो आनंद होतो ह्यालाच मान किंवा सत्कर्माचे फळ. म्हणतात. अपमान ह्मणजे आपण जें दुष्कर्म किंवा वाईट काम झणजे ज्यापासून बहुतकरून आपणास किंवा दुसऱ्यास पीडा होउन कोणाचंही व त्यांत विशेष करून गरीबाचे अंकल्याण होईल, व त्यामुळे दुसऱ्यांच्या मनांत आपणा विषयी वाईट बुदि उत्पन्न होऊन ते आपले अहित इच्छितील व शक्ति असे - ल तर करतील व जग आपला तिरस्कार करील ह्या योगाने परिणामी आपलें अकल्याण होऊन आपणास पश्चात्ताप उत्पन्न होऊन आपलें अंतःकरण दुःखसागरांत निमग्न होईल व अशा वेळी कोणी आपणा विषयी दया न करतां सर्व आपला तिरस्कार करतील. ह्यालाच अपमान किंवा दुष्कर्माची शिक्षा म्ह.. णतात. ज्या कामांत आपली चोख वर्तणूक असतां, आपला अपमान होण्याची वेळ येईल किंवा होईल तर त्या विषयी मनांत दुःख