पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० विचार. १ विचार ह्मणजे आपल्या कार्याचा आरंभ व परिणाम या बद्दल कार्यास आरंभ करण्यापूर्वी ज्ञान करून घेणे. २ योजलेल्या कार्याच्या परिणामाचे व ते सिद्धीस नेण्याचे ज्ञान करून घेणे व मग मी असें करीन मी तसे करीन अशा बाता न मारितां तें सिद्धीस नेण्यास झटणे हे सुज्ञाचे लक्षण होय. कारण कार्य सिद्धीस गेल्या शिवाय ते उघडकीस आले तर तें सिद्धीस जाण्यास आडचणी उभ्या होतात व जर तें सिद्धीस न गेले तर आपली फजीती होते. दुसरे परिणामाचा विचार केल्याशिवाय आरंभ केला तर मागून पश्चात्ताप व दुःखें उत्पन्न होतात. ३ कोणतही कार्य करण्यापूर्वी त्या विषयी विचार केल्याने क्रोधांत असलो तर क्रोध, संतापांत असलो तर संताप, निराशेत असलो तर निराशा प्रथम दूर होऊन आपले मन स्थिर होते. या योगाने जे आपण कार्य करणार त्याविषयी दूरदृष्टीने विचार करितों यास्तव आपणास पुढे पश्चात्तापाची पाळी येत नाही. ४ विचार हेच गणपतिपूजन होय. कारण ज्या कार्याच्या आ रंभी त्या विषयी पोक्त विचार झालेला आहे, त्यांत बहूतकरून विघ्न येत नाही, किंवा पश्चात्तापाची पाळी येत नाही.