पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरास कंटाळल्यामुळे व घरांतल्या माणसाच्या त्रासामुळे आपण बाहेर विश्रांतीस ठिकाण शोधतो. दुसऱ्याची प्रीति संपादण्यास व परक्या बराबर आपल्या करमणकींत काल क्रमणकरण्यांत आपणाला घरांपेक्षां विशेष खर्च करावा लागतो व आपणास हलकेपणाही येतो. ह्यास्तव अखेरीस आपले घराकडे लक्ष लागते परंतु आपल्या इतक्या दिवसांच्या निष्काळजी वर्तणूकीने घरांतील स्थिति देशोघडीस लागलेली असते, ती आपल्याच्याने पुनः सुधारली जात नाही. ह्या करितां आपला सर्व जन्म दुखांत, त्रासांत संकटांत व पश्चाापत्तांत व्यर्थ जाऊन पाठीमागे अपकीर्त मात्र रहाते. गृहकार्यदक्षता ठेवल्याने कौटुंबिक मनुष्ये संतोषी रहातात: संकटांतही त्यांचे धैर्य न सुटतां ते आनंदांत शांततेने वागतात. कारण आपणावर त्यांचा विश्वास रहाण्यास हा गुण साधन होतो. आपल्या हातून अयोग्य खर्च व वाईट वर्तणूकीचे कार्य घडत नाही. या योगाने आपले आयुष्य सुखांत, व आनंदांत जाते, आपल्या कड़न आपले धर्म बजावले जातात, ह्या मुळेपश्चात्ताप होत नाही व आपल्या पश्चातही सर्वाच्या मनांत आपल्याविषयी पूज्यबुद्धि कायम रहाते. अर्थात् ह्या एका गुणाने आपण कुटुंबाच्या सुखास कारणीभूत होतो.