पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गरीबाने नम्र व प्रामाणिकपणाने रहावे. कारण त्या शिवाय त्याला साह्य किंवा आश्रय मिळणार नाही. ९ गरीबाने उदासीनपणाने राहूं नये. कारण उदासीन राहिल्याने उद्योग होत नाही, त्यामुळे निर्वाह होण्यास मात्र जास्त अडचण पडते. १० गरीबाने आपल्या स्थिती बद्दल परमेश्वरास दोष देऊ नये. का रण एकतर परमेश्वराची निंदा होते; दुसरे आपला उद्योगाचा अमोल्यवान् वेळ फुगट जातो आणि तिसरे दुसऱ्याला आपल्या विषयी तिरस्कार उत्पन्न होतो. गृहकार्यदक्षता. १ गृहकार्यदक्षता ह्मणजे स्वतः उद्योग करून घरच्या मनुष्यांचे संरक्षण व पोषण करून आप्त वर्गीस संतोषीत ठेवणे. २ गृहकार्यदक्षता न ठेवल्याने कुटुंबांतील मनुष्ये कंटाळतात. ३ कुटुंबांतील माणसे कंटाळल्याने त्याची आपल्यावरची ममता कमी होते. अर्थात् आपण अप्रीतीस पात्र होतोच. ४ आपण गृहकार्यदक्षतान ठेवल्याने घरची मनुष्ये आपली वर्तणक सुधारावी ह्या हेतूने वारंवार बोलतात. ५ घरांतील मनुष्यांच्या वारंवार बोलण्याने आपण जे फक्त गृह कार्य दक्षता ठेवीत नव्हतों तेच आतां घरांत रहाण्याचा किंवा घरांतल्या मनुष्यांशी बोलण्याचा व सहवासाचा तिरस्कार करितों.