पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०७ १२ श्रीमंतांनी निर्धनाचा तिरस्कार करू नये. कारण विनाप्रयोजन दुसऱ्यास दुःखविणे हे मूर्खाचें लक्षण होय. गरीब. १ गरीबी ह्मणजे मेहेनत करून स्वतःचा निर्वाह काटकसरीने करणे. २ गरीबीनें खुशीत असावे, कारण तो संप आणि शान्तीमध्ये असतो. गरीबाने संतोषित रहावे. कारण तो खुशामती आणि लटपटी मनुष्यापासून मोकळा रहातो. गरीबाने श्रीमंताचा द्वेष करूं नये. कारण गरीबाला श्रीमंताच्या सखाचा जसा लाभ मिळत नाही, तव्दत् त्याच्या दुःखाचाही अनुभव येत नाही. गरीबाने आपल्या हलकेपणा बद्दल दुःख मानूं नये. कारण तो जगाच्या निर्वाहाच्या आणि सुखाच्या वस्तु उत्पन्न करणारा आहे. गरीबानेही दुसऱ्याला यथाशक्ति साह्य करावें. कारण दुसऱ्या चें सुख इच्छिणे हा मनुष्यमात्राचा धर्म आहे. ७ गरीबाने लबाडी व लुच्चेगिरी न करितां उद्योगाने आपला निर्वाह करावा, कारण त्याला अब्रू व प्रतिष्टा मिळविण्यास हाच मार्ग मोकळा आहे.