पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ श्रीमंती. .. . 6 श्रीमंत ह्मणजे स्वतः सुखी असून दुसऱ्याला सुख देण्याची साधने ज्या जवळ आहेत तो. श्रीमंतांनी गरीबाला त्याच्या पीडा आणि दुःख निवारणार्थ मदत करावी किं जेणेकरून तो मानास पात्र होईल. श्रीमंतांनी गरीबाचे हरामी आणि लुच्चे लोकापासून रक्षण करावे किं त्याची कीर्त होईल. ४. श्रीमंताने दयेस योग्य असा कामाचा शोध करावा किं जेणे क रून दुःखीताचे दुःखा निवारण होईल. श्रीमंतानें गरीबांच्या दुःखाविषयीं तपास करावा किं ज्याने तो दुसऱ्याचे प्रेम संपादन करूं शकेल. श्रीमंतांनी सद्गुणाला आश्रय द्यावा किं लुच्च व लबाड ह्या पासून त्याला धोका न पोचता त्याची वृध्दि होईल. श्रीमंतांनी व्यापार, हुन्नर व कळा ह्याला साह्य करावे किं जेणे करून स्वतःचीही श्रीमंती वाढून देशाचेही कल्याण होईल. श्रीमंतांनी विद्येला मदत करावी किं जेणेकरून स्वतः व देशबंधु अज्ञानांत राहणार नाहीत. श्रीमंतांनी महाभारत काम चालू करावी किं जेणेकरून देशाची शोभा वाढून गरीबास आश्रय मिळेल. १० श्रीमंतानें गरीबाच्या दौलती वर नजर ठेऊं नये किं जेणे क रून तो सर्वांच्या विश्वासास पात्र होईल. ११ श्रीमंतांनी पैशाचा अभिमान धरूं नये, कारण तो अशाश्वत आहे.