पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०५ ११ चाकराला हलका पाडूं नये किं तो निर्लज होईल. १२ चाकरावर तपास केल्या शिवाय अपराध ठेवू नये किं त्या च्या मनांत आपला अल्प विचार व कमअक्कलेविषयी खात्री होईल. १३ चाकराला आपले गुह्यछिद्र किंवा अयोग्य कर्म ह्यासंबंधी माहीती देऊं नये किं तो आपल्या वरती तार करील. १४ चाकराने नोकरी विषयी दुःख मानूं नये, कारण चाकरीमुळे संसारी कर्जजाळ आणि चितेपासून त्याचे मन मोकळे रहाते. १५ चाकराने नम्रपणा व सांगीतलेले काम तुर्त करणे या दोन गु णाचा अवश्य आश्रय करावा किं ज्यामुळे धन्याची प्रीति प्रा प्त होईल१६ चाकराने धन्याचा ठपका शांतपणे सहन करावा, किं ज्या मुळे त्याला (चाकराला) आपल्या चुकीविषयीं ज्ञान होईल. १७ चाकरांनी धन्याच्या फायद्याच्या कामांत लक्ष द्यावे कारण झाडाला खतपाणी दिल्या शिवाय फळ मिळेल काय ? १८ चाकराने धन्याच्या कामांत उद्योगी रहावे किं धन्याच्या मनांत त्याच्या कल्पनें विषयी बुध्दि उत्पन्न होईल. १९ चाकराने आपल्या नोकरीचा वेळ फुकट घालवू नये. कारण तो तिचा मालक नाही. २० चाकराने धन्याला हलकेपणा येईल असें कर्म करूं नये किं जेणे करून स्वतःच्या [ आणि कुळास जातीस व देशासही ] अब्रूस बट्टा लागेल.