पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ मावाला टोचून बोलू नये की त्याच्या मनांत आपल्याविषयी द्वेष उत्पन्न होईल. १४ भावाची फजीती करण्याची इच्छा करूं नये की आपल्या कु ळाचा बोज जाईल. १५ भावाचा पक्ष सोडूं नये किं आपण बंधुधर्म (सहाय्य करणे) ह्या पासून भ्रष्ट होऊन अपमानास पात्र होऊ. १६ मावाला चांगली सल्ला द्यावी की त्याला चुकीच्या तडाक्यांत सांपडून पश्चात्ताप व संकट प्राप्त न होईल. पुत्रधर्म. १ पुत्र ह्मणजे आज्ञांकित, विश्वासु, शुभेच्छक, कल्पवृक्ष होय. पुत्राने मातापित्यांचे आशंत वागावें कारण तो स्वतःस्वतंत्र पणाने वागण्यास लायक नाही ( ह्मणजे अज्ञान आहे. ). . ३ पुत्राने मातापित्याला सुख द्यावें, कारण कृतज्ञता हेच मनु प्य जातीचे पहिले लक्षण होय. ४- पुत्राने बाळपणांत व ज्वानीतही आईबापच्या आज्ञेत वागावे कारण तरुणपणांत तो अल्लड अविचारी व उतावळा असतो. ५ पुत्राने आईबापाला कोणत्याही प्रकारे दुःख देऊं नये कारण त्यांनी पुष्कळ दुःख सहन करून पुत्राला सुख दिले आहे. पुत्राने आई बापांच्या विचाराशिवाय किंवा त्यांच्या विचारा विरुध्द कांहीं करूं नये कारण त्यांच्या पेक्षा काया वाचा