पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मन व धनें करून पुत्राचे कल्याण इच्छणारे व करणारे दुसरे कोणी नाही. पुत्राने आईबापांचा अपमान करूं नये कारण त्यांच्यामुळेच तो येवढ्या योग्य पदास चढला आहे. पुत्राने आईबापांची निंदा करूं नये कारण डहाळीच्याने झाडाची निंदा करवेल काय ? पुत्राने हरेक प्रकारे आईबापांला सुख द्यावे कारण [ लहानपणापासून ) त्यांनी त्याच्या पासून सुख मिळविण्याची आशा ठेविली आहे. १० पुत्राने नीतिने वागावें व यशाचें कार्य करावें. कारण त्या पा. सून त्यांना संतोष हाऊन स्वतःचेही कल्याण होतें. ११ पुत्राने आईबापाची सेवा करावी कारण त्यापासून त्याच्या जीवाचा थकवा नाहीसा होतो. १२ पुत्राने आईबापावर रागाऊं नये, कारण पुत्राविषयी त्यांचे अंतःकरण फार कोमळ असते. १३ पुत्रधर्म पाळणे म्हणजे जगाच्या पहिल्या कसोटीत पास हो. णे होय, कारण सर्व कामांत व श्रमांत पुत्रधर्म पाळणे फार कठीण आहे. १४ निष्टावान पुत्राची सेवा गुलाबाच्या फुलां पेक्षा किंवा केवड्या च्या कणसापेक्षाही श्रेष्ट आहे. कारण ती अक्षय सुंगंध देते [ सुकत नाही ]. १५ पुत्राने आईबापांच्या ठिकाणी आपला पुत्रधर्म पाळला तर तो या जगाच्या दुःखपश्चात्तापशरमरूपी जाळ्यांत न फसतां यशासहीत शांतीच्या मंडपांत जाऊन पोहोचतो.