पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंधुधर्म १ बंधु ह्मणजे सहाय्यकारी. २ भावाशी निष्कपटांनों वागावें की संशयाला जागा मिळणार नाही. भावांना टाकून एकटें खाण्याची इच्छा करूं नये किं ज्यामुळे एक जूट कायम राहील. ४ विभक्त राहिलों तरी भावाला मदत करावी किं प्रीतीची वृद्धि होईल. ५ भावाशी बायकोवरून विटूं नये कारण तसे केल्यानी मात्र आपली अल्पबुद्धी दृष्टोत्पत्तीस येते. ६ मावाशी निर्दयतेने वागू नये की त्याला आपला त्रास होईल. भावाची निंदा ऐकण्याची इच्छा करूं नये की जेणे करून दुसयाचे मनांत आपल्याविषयी हलका विचार उत्पन्न होईल. भावाचे कोणत्याही प्रकारे हाल करूं नयेत की त्याला दुःख होईल. भावावर खोटी तोहमत ठेवू नये की त्याच्या मनाचा संताप होईल. १० भावाला अपराधाविषयी क्षमा करावी की त्याच्या मनांत पू. ज्य बुध्दि उत्पन्न होईल. ११ भावाची काळजी बाळगावी की तो आपल्या वचनांत राहील. १२ भावाचा घात करूं नये की आपण जगाचा विश्वास आपल्या वरचा घालवून तिरस्करास पात्र होऊन आपणास पश्चात्ताप व दुःख प्राप्त होईल.