पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ पित्याने पुत्राला ताबेदारीत ठेवावा ( युक्तीनें ] की त्याला पुढे जड न जाईल. १४ पित्याने पुत्राला नम्रता शिकवावी की पुढे त्याला लाज न वाटावी. १५ पित्याने पुत्राला उदारता शिकवावी की तो सुखी होईल. १६ पित्याने पुत्राला उदारता शिकवावी की तो दुसऱ्याची प्रीति संपादन करूं शकेल. १७ पित्याने पुत्राला खाण्यापिण्याचा अदमास शिकवावा की त्याचे प्रकृतीस वारंवार विकार होणार नाही. १८ पित्याने पुत्रास न्यायाने वागण्यास शिकवावें की तो जगांत प्रतिष्टा पावेल. १९ पित्याने पुत्राला शुभेच्छुकपणा शिकवावा की त्याचे मन त्याला न खाईल. २० पित्याने पुत्राला उद्योग शिकवावा की त्याला दरिद्रता न येईल. २१ पित्याने पुत्राला कलाकौशल्य शिकवावे की त्याचे आयुष्य ___ जगाला उपयोगी होईल. २२ पित्याने पुत्रास धर्माने वागण्यास शिकवावे की त्याच्या मरणा_च्या वेळेस त्याच्या मनाची शांतता राहील. २३ पित्याने पुत्राला दक्षता शिकवावी की त्याचे नशीब उघडेल. २४ पित्याने पुत्राला मेहनत करण्यास शिकवावी की त्याचे शरीर कसेल. २५ पित्याने पुत्राजवळ बोबडे बोलूं नये किंवा चावटपणा करूं नये की तो तोतरा व ख्याली खुशाली होईल.