पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पित्याने मुलाच्या मनाच्या डाहळ्या सुनीतीकडे प्रयत्नानी वळवाव्या कारण डाहळ्याखाली पुढे विश्रांती घ्याव याची आहे. ४ पित्याने आपल्या योग्य वागणुकीनें पुत्राचे मन आपल्याविषयी शुद्ध ठेविले पाहिजे कारण त्या शिवाय आपल्याविषयी पूज्य बुद्धि त्याच्या मनांत कशी उत्पन्न होईल. पित्याने पुत्राचे हाल न करितां त्याच्या शरीराला जपावें कारण आपण घोड्यावर व घोडा आपणावर हे लक्षात आणिले पाहिजे. पित्याने पुत्राला विद्या शिकवावी कारण त्याशिवाय त्याला स्वतःविषयीही ज्ञान होणे कठिण तर पिता ह्मणजे काय पदार्थ हे त्याच्या लक्षांत कसे येईल. ७ पुत्राचे शुभ इच्छिणाऱ्या पित्यांनी फाजील खर्च करूं नये की आपल्या पाठी मागे त्याच्या वर कर्जाचा बोजा न पडेल. ८ पत्याने पुत्राला आपला कुलाचार व वाडवडिलांची हकीकत सांगावी की तो त्या कामांत अजाण राहून आपल्या पाठीमागें आपल्या वंशजांची हकीकत लयास न जाईल. पित्याने पुत्राच्या अपराधाचे कौतुक करूं नये की तो चावट होईल. १० पित्याने पुत्राला वारंवार मारूं नये की तो उद्धट होईल. ११ पित्याने पुत्राला वारंवार मारूं नये की तो कोडगा होईल. १२ पित्याने पुत्राला शिव्या देऊं नये की तो निर्लज्ज होईल.