पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ स्त्री कुरूप असली तर तिच्याविषयी मनांत हलका विचार आणू नये व त्याबद्दल बाहेर मस्करीतही काही बोलूं नये. ह्मणजे तिला दुःख होईल असें करूं नये, २३ स्त्रीला शिव्या तर अगदी देऊं नये कारण तसे केल्याने मात्र आपला हलकट स्वभाव बाहेर दिसून येतो. २४ स्त्रीला मारूं नये कारण मारणे हे तिच्याशी संबंध तोडण्याच्या अगोदरचीच पायरी आहे. २५ नीतिमान पुरुषाची लक्षणे. स्त्रीशी मानाने वागणे, स्त्रीवर प्रीति करणे, स्त्रीशी नीतीने वागणे, स्त्रीशी निष्कपटाने वागणे, स्त्रीचे हाल न करणे, स्त्रीविषयी काळजी बाळगणे, स्त्रीशी गोड बोलणे, स्त्रीला योग्य व अयोग्य हे युक्तीने सागणे, स्त्रीचे दुःख पाहून तिच्यावर दया करणे, स्त्रीला हलकें न समजणे, स्त्रीविषयी संशयांनी न वागणे, स्त्रीला योग्य मोकळीक देणे, स्त्रीवर उगाच न रागावणे, स्त्रीशी फाजील चावटपणा न करणे, स्त्रीची वांरवार निंदा न करणे (मस्करीतही). पिताधर्म. १ पिता ह्या शब्दाचा अर्थे जनक, पालक, मालक व उत्पादक. पित्याने मुलाचे अति कष्टानेही संरक्षण करावे कारण ते विश्वासाने सोपलेली वस्तु आहे [ परमेश्वराची ]..