पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रीतीनें ठपका द्यावा. पुरुषाने स्त्रीला जबरदस्तीने ताब्यांत आणण्याची इच्छा करूं नये. पुरुषाने आपल्या घरच्या संबंधाने नफ्यातोट्याची गोष्ट बिनधोक स्त्री जवळ सांगावी कारण तिची सल्ला वाजवी मणजे हितकर असल्याने सहसा आपण फसले जाणार नाही. स्त्रीला जेव्हां कोणतेही दुःखणे होईल तेव्हां तिची प्रेमाने बरदास्त करावी कारण पतीची नजर आणि दया यांनी जो गुण येईल तो वैद्याच्या औषधांनीही येणार नाही १० स्त्रीला मुद्दाम त्रास देऊ नये. ११ स्त्रीशी अति वश होऊ नये. १२ स्त्रीशी उध्दटपणा करूं नये. १३ स्त्रीवर भलताच आरोप संशयांनी किंवा कोणाचे ऐकून ठेऊ नये. १४ स्त्रीला अयोग्य स्वतंत्रता देऊ नये. १५ स्त्रीला सक्त बंधनांत ठेवू नये. १६ स्त्रीशी निर्दय होऊ नये. १७ स्त्री सांगेल त्याचा नीट विचार व तपास करावा. १८ स्त्रीचा चौघांत तमाशा करूं नये. १९ स्त्रीचे मीजास वाढवू नये. २० स्त्रीचे वजन कमी करूं नये. २१ स्त्रीचे रूपाविषयी मनांत अभिमान धरू नये, कारण पितळेच्या व सोन्याच्या भांड्यांतले पक्वान्न सारखें असतें. १३