पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प. १३ स्त्रीने कामाशिवाय पर घरी जाऊं नये. १४ स्त्रीने परपुरुषाशी विनोद किंवा हंसू नमे त्याची मस्करी करूं नये, अन्य पुरुषांशी एकांत गोष्ट करूं नये. १५. स्त्रीने वाईट बायकांच्या कपटी काव्याविषयी जपावें किं फशी पडण्याचा प्रसंग येणार. १६ स्त्रीयांनी पाहुण्याची बरदास्त ठेवण्यास झटावें किं घरचा आब वाढेल. १७ स्त्रीयांनी वागण्यांत सुघडतेने, बोलण्यांत मधुरतेनें, कामांत चपलतेने धर्मात आतुर, निष्टेत अचळता व भयांत धीर तेनें रहावें. १८ स्त्रीने आपल्या कर्माने स्वपतीचे मन दुःखवेल किंवा तो लजे. स पात्र होईल ह्या विषयी पूर्वी विचार करावा. १९ स्त्रीने आपल्या पतीची आवक व खर्च याविषयी विचार करून वागावें. स्त्रीने स्वपतीच्या कल्याणाविषयी विचार किंवा काळजी न करणे ह्मणजे आपण दोन पायाचे पशु आहोत अशी जनाची खात्री करणे. सुशील स्त्रीयांची लक्षणे. सल्ला किंवा विचार देण्यांत दूरदृष्टि व पोक्तपणा. २ काम करण्यांत मेहेनती. ३ प्रीतिमध्ये अपूर्वता. ४ धर्मात श्रध्दावान. ५ क्षमावान. नम्र.