पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्रीयांनी पतशिी मिळून रहाणे ह्मणजे त्याच्यांशी नम्रतेने व गोडीगुलाबीने वागणे. ५ स्त्रीने पतीच्या योग्य सुचनेचे उल्लंघन करणे ह्मणजे त्याच्याशी बेइमानीपणा करणे. अर्थात त्याचे व आपले नुकसान न समजणे. स्त्रीने पतीचे माता, पिता, बंधु भगिनि इत्यादिकांशी द्वेष करणे ह्मणजे पतीच्या विरुध्द कर्म करण्यास प्रवृत्त होणे. स्त्रीने पतीला खुष ठेवणे ह्मणजे आपले आयुष्य सुखांत जाण्याची इच्छा करणे. स्त्रीने पती क्रोधांत, संतापांत, काळजीत कष्टाने श्रमित असतां त्याचे शांतवन करणे ह्मणजे आपल्या कर्तव्या पैकिएक फर्ज आदा केली असे होय. स्त्रीने पतीशी सत्याने वागले पाहिजे नाही तर शंका आणि अविश्वा स प्रीतीचा ह्मणजे तिच्या सुखाचा नाश करितील. ९ ज्या स्त्रीने आपले प्रेम तोडले तिच्यांत आणि वाईट स्त्रीत काय फेर ! १० जी स्त्री आपल्या पतीचे ह्मणजे घरचे हिताहित समजत नाही तिच्यांत व मोलकरणांत काय अंतर ! ११ स्त्रीने आपल्या सासुसासऱ्याला माता पित्या प्रमाणे समजले पाहिजे व चाकराशी ममतेने व चोख वागले पाहिजे. १२ स्त्रीने आपल्या पतीचे मित्र ते आपले हितचिन्तक व चीपते शत्रु ते आपले ही वैरी असे मानले पाहिजे.