पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ चहडतीमध्ये आपण दुसऱ्याला त्रास देण्यास व दुःखी कर ण्यास आपल्याने होईल तेवढा प्रयत्न करण्यांत शौर्य मानतो. २९ पडतीत आपण परमेश्वराची वारंवार प्रार्थना करतों व क्षमा मागतों ३० चहडतीत आपण परमेश्वराची निंदा करतों व नास्तिक होतो. सारांश. चहडतीत आपल्याला जे जे दुर्गण जडण्याचा प्रसंग येतो त्या वेळेस सावध राहून त्या दुर्गुणापासून दूर रहाणे व पडतीत मनुप्यांवर सद्गुणाचे जे जे ठसे उमटतात ते चहडतीमध्ये वितळून जाऊ न देतां कायम ठेवणे. कारण पडतीचा मुख्य हेतु दुर्गुणाचा ह्मणजे दुष्ट मनोविकाराचा नाश होऊन भावी चहडतींत सद्गुणामुळे सुख संपादन करण्यास योग्य होणे. स्त्रीधर्म. स्त्रीधर्म ह्मणजे स्त्रीयांनी कशा रीतीने वर्तन केले पाहिजे की जेणे करून ईहपर लोक साधतील. स्त्रीयांनी आपल्या पतीशी नम्र पणाने व साळसूद वागले पाहिजे. कारण स्त्री आपले व आपल्या कन्या पुत्रांचे पोषण स्वपती जवळून काबाड कष्ट करवून पुरे करवून घेते.