पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० रंग आपणास वारंवार हद्दीच्या बाहेर जाण्यास भाग पाडतात. १९ पडतीमध्ये आपण देव, वडील, सज्जन, ह्यांच्याकडे मानानें पहातों व निर्बळ दुःखी वृध्द ह्यांच्या समोर दयची दृष्टि करितों. चहडतींमध्ये आपण देव, वडील, सज्जन, धर्माधिकारी, ह्यांच्या कडे उध्दटपणाने वागतों व निर्बळ दुःखी वृध्द ह्यांच्याशी बेपर्वाई करतो. आणि त्यांच्या स्थितीविषयी मस्ककरी व तिरस्कार करतों [ शरम ]. २१ पडतीमध्ये आपण कुटिल स्त्रियांचे व लबाड घातकी पुरुषांचे कावे ओळखं शकतो ह्यामुळे आपण त्यापासून सावध रहातो. २२ चहडतीमध्ये आपण कुटिल स्त्रियांचे व लबाड घातक पुरुषांच्या करतुकीत भुलून गर्क होतों ( ह्यामुळे अखेरीस फसले जातों ). २३ पडतीमध्ये आपल्या शत्रूलाही आपल्याविषयों दया उत्पन्न होते. २४ चहडतीमध्ये ईर्षेने आपले मित्रही आपला द्वेष करितात. २५ पडतीमध्ये आपण सर्व कामांत आपल्या स्वतःवर, व परमे श्वरावर भरंवसा ठेवितों [ ह्यामुळे पार पडतों ]. २६ चहडतीमध्ये आपण अज्ञाना सारखे होऊन दुसऱ्या वरती आपला भार ठेवितों ( ह्यामुळे फसले जातों). २७ पडतीमध्ये आपण दुसऱ्याचे सुख इच्छितो.