पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवटचा अंक प्रकाशित झाल्यानंतर... १. अंतर्नादपर्व स्नेहा अवसरीकर पुणे विद्यापीठाकडून औंधकडे जायला निघालं की पहिल्यांदा ब्रेमेन चौक लागतो आणि तिथून डावीकडे वळलं की लगेचच बँक ऑफ महाराष्ट्रची निळ्या रंगातली पाटी दिसते आणि त्याच्या अगदी समोर पाहिलं की उर्मी वाचनालय अशी पाटी दिसायची. इथूनच अंतर्नाद मासिक ऑगस्ट १९९५ महिन्यापासून सुरू झालं आणि तेव्हापासून २३ वर्षं दरमहा एक तारखेला प्रकाशित होत गेलं. ह्या तारखेत कुठल्याही कारणांनी कधीही खंड पडला नाही ही फार विशेष गोष्ट आहे. त्यानंतरची तीन वर्षं केवळ दिवाळी अंक निघाला. यंदाच्या म्हणजे २०२० सालच्या दिवाळी अंकानंतर अंतर्नाद पूर्णविराम घेत आहे. भानू काळे यांनी हे मासिक सुरू केलं तो काळही मासिकांना अनुकूल नव्हताच, दर्जेदार समजली जाणारी मासिकं बंद पडली होती. मराठी भाषा आणि तिचं अस्तित्व याविषयी चर्चा सुरू होती. पण तरीही काळे यांनी हे मासिक सुरू केलं आणि पहिल्या अंकापासून त्याची संपादकीय आणि व्यवस्थापकीय घडी फार कौशल्याने आणि मेहनतीने बसवली. यामध्ये कुठल्याही नियोजित तारखेत कधीही बदल झाला नाही. लेखकांचं मानधन आणि इतर तत्सम गोष्टींची पुर्तताही न चुकता एक तारखेला होत गेली, सुरुवातीपासूनच अंतर्नादचे अंक फार बहारदार असायचे. राजकारण हा विषय सोडला तर जवळपास सगळ्या विषयांना मासिकात जागा होती. शान्ताबाई शेळके यांचं कविता स्मरणातल्या हे अप्रतिम सदर सुरुवातीपासून होतं. जुन्या सुंदर कवितांचं विस्तृत रसग्रहण शान्ताबाई करत असत. लक्ष्मणझुला हे एक विशेष सदर लक्ष्मण लोंढे लिहीत असत. हेही तीन वर्ष सुरू होतं. अवधूत परळकर, मधुकर धर्मापुरीकर, विजय पाडळकर, सुबोध जावडेकर, पंकज कुरुलकर, आनंद अंतरकर अशा अनेक लिहित्या लेखकांनी बरीच वर्षं आपलं अप्रतिम लेखन अंतर्नादकडे आवर्जून पाठवलं, याचं मुख्य कारण म्हणजे संपादकांनी थोडक्या काळात कमावलेला विश्वास मराठी मासिकांसाठीचा सर्वोत्कृष्ट असा वाढता वाचकवर्ग हेही एक मोठं कारण असावं. आपलं लेखन ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं असं लेखकाला वाटतं तो वाचकवर्ग अंतर्नादला लाभला होता. अंतर्नादमध्ये पहिल्यापासून जसं या मान्यवरांचं लेखन प्रकाशित होत होतं, तसंच नव्या उमेदीने लिहू पाहणाऱ्या लेखकांनाही आवर्जून स्थान मिळत असे. वैशाली पंडित, प्रमोदिनी वडके कवळे, सतीश वसंत कुलकर्णी, परशुराम देशपांडे अशी कितीतरी त्याकाळी नवोदित असलेली मंडळी या मासिकातून ५०८ निवडक अंतर्नाद लिहिती झाली. फिल्म्स डिव्हिजनचे प्रेम वैद्य, आकाशवाणीचे पंडित अरविंद गजेंद्रगडकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना संपादकांनी लिहीतं केलं. साहित्यप्रांतात कुठेही फारसा सार्वजनिक वावर न ठेवता, पुण्यातल्या औंधसारख्या एका कोपऱ्यात सातत्याने, ध्यासाने काम करत साहित्यक्षेत्रात एक दर्जेदार ठसा संपादकांनी उमटवला. हा काळही अनेक सामाजिक, जागतिक बदलांचा काळ होता. वृत्तपत्रं, पुस्तकं आणि मासिकं वाचून आपली वाचनाची भूक भागवणारी या काळातली पिढी म्हणजे तसं करणारी शेवटची पिढ़ी, मराठी माध्यमाकडे पाठ फिरवून घरोघरी इंग्रजी माध्यमाची शाळा निवडणारे पालक याच काळात तयार झाले. वाचनापेक्षाही अधिक आकर्षक, अधिक रंगीत, अधिक सहज होणारी करमणूक या काळात सर्वदूर पसरली. या सगळ्या अतिशय गुंतागुंतीच्या, मोहमयी समाजात नेटाने एक मराठी मासिक वाचकांच्या हाती दरमहा सोपवत राहणं हे काळे यांनी केलेलं सगळ्यात कठीण आणि महत्त्वाचं काम आहे. कारण या पुढच्या काळात छापील स्वरूपात सलग पंचवीस वर्षं असं एखादं मासिक प्रकाशित होत राहणं, तेही एकहाती, हे कितपत शक्य होईल याविषयी शंकाच आहे अंतर्नादच्या वाटचालीत सुरुवातीला अगदी वर्गणीदार नोंदण्यापासून व पुढे संपादकीय कामातही मी सहभागी होते. संपादक काळे, लेखक काळे, आपल्या अंतर्नादाशी प्रामाणिक राहात चोख काम करणारे काळे आणि यासह माणूस म्हणून असणारे काळे मला जवळून अनुभवता आले. एक अनोखी उर्मी बाळगत त्यांनी हे काम सुरू केलं आणि आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ यात घातला. त्यातून त्यांना काय मिळालं असेल? ह्याविषयी त्यांच्याशी कधीतरी बोलायला हवं आहे काळे रोज सकाळी बारा ते संध्याकाळी पाच कार्यालयात असत. मासिक चालवणं हे पूर्णवेळ काम आहे हे त्यांनी मला वारंवार सांगितलं आहे. मासिकाकडे येणारं प्रत्येक लेखन, अनाहूत असो की मुद्दाम लिहून घेतलेलं असो; ते स्वतः वाचत. त्याच्या पहिल्या वाचनासाठी काही लेखन माझ्याकडे आणि वर्षा काळे यांच्याकडे देत असत, मात्र अंतिम निवड ते स्वतः वाचल्याशिवाय कधीही करत नसत. ह्या लेखनासंदर्भात सगळा पत्रव्यवहार ते स्वतः हाताळत. प्रत्येक कृतीत काटेकोर शिस्त त्यांच्याकडे असल्यामुळं अगदी वर्गणीदार नोंदणीसाठीच्या रजिस्टरपासून ते अंकावर वर्गणीदारांचा पत्ता कसा लिहावा