पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. • • ● . ● · भानू काळे यांची काही रसिकमान्य पुस्तके तिसरी चांदणी : आणीबाणीपूर्व बिहार- ओरिसाच्या राजकीय पार्श्वभूमीवरील मॅजेस्टिक प्रकाशनाच्या कादंबरी स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त कादंबरी, पहिली आवृत्ती : १९७९, मॅजेस्टिक प्रकाशन दुसरी आवृत्ती, मौज प्रकाशन, पृष्ठे २२९, रुपये २२५ कॉम्रेड : साठ वर्षे पूर्ण वेळ कामगारचळवळीत काम केलेल्या एका मुंबईस्थित कामगारनेत्याच्या जीवनावरील कादंबरी. पहिली आवृत्ती : १९८९, ग्रंथाली प्रकाशन, दुसरी आवृत्ती, मौज प्रकाशन, पृष्ठे २०५, रुपये २२५ बदलता भारत देशभर प्रत्यक्ष भ्रमंती करून टिपलेली, जागतिकीकरणात होणाऱ्या बदलांची निरीक्षणे, केशवराव कोठावळे परितोषिकप्राप्त ग्रंथ. सहावी आवृत्ती, मौज प्रकाशन, पृष्ठे २६०, रुपये २६० अंतरीचे धावे... : रोचक प्रासादिक शैलीतील आणि विषयांचे वैविध्य असलेला ललितलेखसंग्रह, पुणे नगर वाचन मंदिराचा श्री. ज. जोशी पुरस्कारप्राप्त ग्रंथ. तिसरी आवृत्ती, पृष्ठे २३३, रुपये २०० वेगळ्या वाटा शोधताना : संगणकतज्ज्ञ विवेक सावंत, सहकारमहर्षी आप्पासाहेब सा. रे. पाटील, 'सर्च'चे प्रमुख अभय बंग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोळकर, रत्नागिरीचे उद्योजक दीपक गद्रे, यटांचे चरित्रकार रुसी लाला, केमोल्ड आर्ट गॅलरीचे केकू गांधी आणि कारागिरांच्या अम्मा रोशन कालापेसी यांची व्यक्तिचित्रे, पहिली आवृत्ती, मौज प्रकाशन, पृष्ठे २२४, रुपये ३३० अजुनी चालतोची वाट... रावसाहेब शिंदे जीवन आणि कार्य : स्वातंत्र्यसैनिक, निष्णात वकील, रयत शिक्षण संस्थेचे व इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्ष आणि समाजातील नैतिक शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे रावसाहेब शिंदे यांचे चरित्र, पाचवी आवृत्ती, ऊर्मी प्रकाशन, पृष्ठे ४४८, रुपये ४५० रंग याचा वेगळा... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन : संशोधनक्षेत्रात आणि शोधपत्रकारितेत आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या एका संवेदनशील व्यक्तित्वाचा वेध लेखसंकलन, संपादन आणि विस्तृत प्रस्तावना दुसरी आवृत्ती, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पृष्ठे ४४०, रुपये ४०० अंगारवाटा... शोध शरद जोशींचा : शेतीमालाला रास्त भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे व एकूणच देशाचे दारिद्र्य दूर होणार नाही हे प्रथमतः मांडणाऱ्या आणि 'इंडिया' विरुद्ध 'भारत' हे भारताचे मूलभूत दुभंगलेपण अधोरेखित करणाऱ्या लढवय्या शेतकरीनेत्याचे सर्वसमावेशक चरित्र, दुसरी आवृत्ती, ऊर्मी प्रकाशन, पृष्ठे ५१२, रुपये ६०० समतानंद अनंत हरी गद्रे, समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार: पत्रकार, मौज व निर्भीड या साप्ताहिकांचे संस्थापक, नाटककार, जाहिराततज्ज्ञ आणि झुणकाभाकर सत्यनारायण या अस्पृश्यतानिवारणाच्या आगळ्या चळवळीतून महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या व्यक्तीचे चरित्र, दुसरी आवृत्ती, डायमंड पब्लिकेशन्स, पृष्ठे १७५, रुपये २२५ पोर्टफोलिओ पंचवीस वर्षांच्या वाटचालीत भेटलेल्या आणि लेखकाचे आयुष्य समृद्ध करून गेलेल्या सव्वीस सुहृदांची व्यक्तिचित्रे, पहिली आवृत्ती, उन्मेष प्रकाशन, पृष्ठे २०९, रुपये २५० गंध अंतरीचा: समाजवेध, वृत्तान्त, साहित्यविचार, व्यक्तिचित्रण, आठवणी, मूल्यचिंतन अशा विविध प्रकारच्या विचारप्रवर्तक आणि तरीही रसाळ लेखांचे संकलन, पहिली आवृत्ती, उन्मेष प्रकाशन, पृष्ठे २०९, रुपये २५० कामगार संघटना - काही निरीक्षणे : गेली शे-दीडशे वर्षे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि कामगारक्रांतीची मशाल उचलून धरणाऱ्या पण आज दिशाहीन झालेल्या चळवळीचा आढावा. पहिली आवृत्ती, डायमंड पब्लिकेशन्स, पृष्ठे ६४, रुपये ९९ कर्मवीर भाऊराव पाटील - एक आधुनिक भगीरथ : जगातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये गणना होणाऱ्या त शिक्षण संस्थेच्या संस्थापकांची प्रेरणादायी जीवनगाथा, पहिली आवृत्ती, डायमंड पब्लिकेशन्स, पृष्ठे १६०, रुपये १९९ (सर्व पुस्तके प्रमुख ग्रंथविक्रेत्यांकडे उपलब्ध) निवडक अंतर्नाद ५०७