पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भरीव उत्तरे आहेत का? विनय हर्डीकर यांचा प्रदीर्घ लेख (ज्ञानप्रबोधिनीचे अप्पा पेंडसे यांच्यावरील) वाचला तो 'प्रसवत' असताना ते दिल्लीत मुक्कामास होते व त्यामुळे लेखात का मांडणी असणार याचा काहीसा अंदाज मला होता, लेखाबद्दल बरेच काही लिहिता येईल. ते टाळतो. पण त्यानिमित्ताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व नंतर शोध घेताना काही जुने कागदही सापडले. १९९२मध्ये ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित आम्ही २५-३० मित्रमंडळी/कार्यकर्ते एक दिवसभर ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित आमचे अनुभव, विचार व भावी संकल्प यांच्यासंबंधी काही पूर्वसूचित प्रश्नांच्या अनुषंगाने गप्पा मारण्यासाठी जमलो होतो, माझे स्मरण ठीक असेल तर त्या दिवशी हर्डीकरही बहुधा होते. त्या गप्पांचे एक टिपण लेखात उल्लेख झालेल्या श्री. राम डिंबळे यांनी तयार केले होते. ते मला सापडले. श्री. डिंबळे यांच्याच सुंदर हस्ताक्षरातील हे टिपण सोबत पाठवत आहे. आज सोळा वर्षांनी त्यांतले आम्ही सर्वजण कोठे आहोत, या प्रश्नाचे उत्तर फार अवघड आहे. बहुधा १९९२ ही तारीख बदलून २००८ ही तारीख टाकणे एवढाच बदल त्यात हाईल. पण त्यावेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने काही भरीव उत्तरे आमच्या गटाकडे आज आहेत का? ज्ञानप्रबोधिनीसारख्या अन्य ध्येयवादी संस्थांकडे ती आहेत का? नसल्यास का नाहीत? डॉ. अजित कानिटकर, नवी दिल्ली (जानेवारी २००९ ) ह्या वर्षी वाचलेल्या दिवाळी अंकांत सर्वोत्कृष्ट मी 'अंतर्नाद'चा अनियमित वाचक होतो. मला वाटते, की एकदोन वर्षे वर्गणीदारही होतो (पुण्याला Posting निमित्ताने असताना). पुढे, मुंबईला आल्यावर गेली दोन वर्षे, 'नित्य' वाचकाचा 'नैमित्तिक' वाचक झालो. असो. अंतर्नादचा दिवाळी २००८ अंक लायब्ररीत वाचनात आला. ह्या वर्षी वाचलेल्या दिवाळी अंकांपैकी हा सर्वोत्कृष्ट अंक वाटला. कुटुंबातल्या प्रत्येक घटकाच्या 'आवडी-निवडी'चे 'काहीना काही' अंकात असलेच पाहिजे, ह्या अट्टाहासापायी, 'ऊंधियू' छाप दिवाळी अंक काढण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्या भाऊगर्दीत 'अंतर्नाद' आपल्या अंगभूत 'मेरिट'वर उठून दिसला, वाचनीय (आणि संग्राह्य) झालाय; पण बाजारात विकत मिळाला नाही. सुरुवातच मुखपृष्ठाने झाली. रवी परांजपे हे ख्यातकीर्त ज्येष्ठ चित्रकार आहेत, ह्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळ्या शैलीतले हे अतिशय सुरेख चित्र, त्याचबरोबर, चित्रकाराच्या परिचयाचा लेख आवर्जून दिलेला, दाद देनी होगी! प्राथमिक शिक्षण विषयावरचा विभाग हे या अंकाचे विशेष बल-स्थळ आणि गौरव-स्थळही! विषय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा, पण कित्येकांच्या मते 'चावून चोथा' झालेला, अशा विषयावर इतके अभ्यासपूर्ण लेख आणि समतोल दृष्टिकोन यांमुळे ह्या चोथ्याचेही मिष्टात्र झाले! कविता दर्जेदार (बहुतांशी). प्रभू राजगडकरांची 'गोंगलू', डॉ. तांबोळींची 'आवाहन' आणि डॉ. ४९६ निवडक अंतर्नाद केळुसकरांची 'कविता' या मला विशेष आवडल्या, 'साहित्यातले दोन शिवाजी' (मिलिंद जोशी) आणि 'पत्रातले तेंडुलकर' (दत्तप्रसाद दाभोळकर) हे दोन लेखही खासच! प्रभाकर करंदीकर, भा.प्र.से., मुंबई ( एप्रिल २००९ ) 'उंची' कवितेचा असाही उपयोग अंतर्नादचा जानेवारी २००९चा अंक हातात पडला. मासिकाच्या पृष्ठ चारवरील श्री. दत्ता हलसगीकर यांची 'उंची' कविता वाचली, छान वाटली व पुढे अंक वाचत गेलो. सर्वांत शेवटी 'भाग्यवती कविता' हा श्री. दत्ता हलसगीकरांचा त्यांच्या 'उंची' कवितेवरील लेख वाचल्यावर मग ती कविता एक/दोन नाही तर दहा वेळा वाचली. पन्नास वर्षे सर्जरी केल्यानंतर कॅन्सरच्या अखेरच्या अवस्थेत असणाऱ्या रुग्णांची वेदनारहित सेवा करण्यासाठी मी जबलपूर येथे कॅमरेक (कॅन्सर) ट्रस्ट स्थापन केला. या रुग्णांची निःशुल्क सेवा करण्याची ही योजना आहे. आमच्या ट्रस्टच्या बैठकीत यावेळी मी 'उंची' कविता वाचल्यावर व त्यातील गर्भितार्थ सांगितल्यावर दहा मिनिटांत पस्तीस हजार रुपये जमा झाले. खरे म्हणजे या प्रकल्पाची माहिती महाराष्ट्रात व्हावी म्हणून माझ्या भावास मी कळवले, त्यावेळी त्याने माध्यमे अशा गोष्टी प्रकाशित करण्यासाठी पैसे मागतात म्हणून कळवले. मी अशा गोष्टींच्या विरुद्ध आहे. यासाठी थांबणे हाच एक मार्ग आहे. वेळ येईल तेव्हा अंतर्नादच्या संपादकांना यासाठी आंतरिक प्रेरणा होईल व मग अनेकांना ही माहिती देता येईल. तोपर्यंत 'उंची' या कवितेचा उपयोग करून घेणार आहे. पुन्हा एकदा उत्तम अंक काढल्याबद्दल धन्यवाद, डॉ. म. द. वैद्य, अधारताल, जबलपूर (मे २००९ ) समाधानकारक म्हातारपण फेब्रुवारी २००९ अंतर्नादच्या अंकातला श्री. किशोर आरस ह्यांचा 'हे म्हातारपणा' हा लेख फार वाचनीय वाटला, ह्या लेखात माझ्या 'प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट' ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे ह्या कार्यक्रमात मी शेवटी म्हणतो, की जर माणसाचे म्हातारपण समाधानकारक व्हायचे असेल तर त्याला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. १) अजेंडा फॉर दि डे (दिवसाचा कार्यक्रम) : सकाळी ६ वाजता उठल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत आपण काय करणार ह्याचा आराखडा मनात सकाळी उठल्याबरोबर आला पाहिजे, २) माइलस्टोन्स टु बी अचीव्हड : भविष्यात ज्या गोष्टी साध्य व्हायला हव्यात त्याचासुद्धा आराखडा मनात हवा. ३) व्हॅल्यू : आपल्या बाकी जीवनामध्ये काही ना काही मूल्यउत्पादन होत आहे असा विश्वास. जोपर्यंत माणूस नोकरीवर किंवा व्यवसायात असतो, तोवर पहिल्या दोन गोष्टी आपोआप होतात. तिसरी गोष्ट, मूल्य, ही माणसाच्या मिळकतीवर अवलंबून असते. म्हातारपणामुळे हे