पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असता, सभोवार इंग्रज स्त्री-पुरुष आनंदात हसत-खेळत वावरत होते. ते दोघे समुद्रकिनाऱ्यावर बसले. आपल्या उदासीन अवस्थेत सावरकरांना मातृभूमीची तीव्र आठवण झाली आणि तिची अनावर ओढ लागली. त्यांची तंद्री लागली आणि त्या नादात ते समोरच्या सागराशी बोलू लागले. निरंजन पाल यांना हा सगळा अनुभव अपूर्व होता. आपल्या विख्यात कविमित्राला ही कविता कशी स्फुरली हे त्यांनी पुढे २९ वर्षांनी (द मराठा, पुणे दि. २७ मे १९३८) लिहून ठेवले : "इतक्यात सावरकरांनी एक गाणे गुणगुणण्यास सुरुवात केली. एकीकडे ते गाणे रचीत असताना ते गातही होते, हिंदुस्थानच्या दीनवाण्या परदास्याचे वर्णन करणारे ते एक मराठी गाणे होते. आजूबाजूच्या सर्व जगाचा विसर पडून सावरकर आपले गाणे गातच राहिले. इतक्यात त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले नि ते त्यांच्या गालांवर ओघळू लागले. त्यांचा कंठ रुद्ध झाला. त्यांचे गाणेही अपूर्णच राहिले आणि सावरकर एखाद्या बालकाप्रमाणे मुक्तपणे लागले?" सावरकरांची ही अजरामर कविता त्यांच्या वादळी आयुष्यातील नंतरच्या घडामोडींत जिवंत राहिली हे आश्चर्यच, डॉ. श्रीरंग गोडबोले, औंध, पुणे (सप्टेंबर २००८) मुस्लीम समाजाचे योगदान प्रश्नातीत अंतर्नादच्या एप्रिल २००८ मधील अंकात पारशी समाजावर किशोर आरस यांचा अप्रतिम लेख आला आहे या छोट्या जमातीने एकूण भारतीय समाजात मिसळून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे, हे निर्विवाद, यावर प्रतिक्रिया देताना श्री. महेश काळे यांनी त्या लेखाची स्तुती करून समारोपात मुस्लीम समाजाचे तुलनेने योगदान किती, असा अप्रस्तुत प्रश्न उपस्थित केला आहे. (अंतर्नाद, सप्टेंबर अंक, पृष्ठ १०) यामागे त्यांची पूर्वग्रहदूषित दृष्टी किती आणि अज्ञान किती हा चर्चेचा विषय होऊ शकतो. व आम्ही अंतर्नादचे सामान्य वाचक, महेश काळे यांच्या प्रश्नामुळे काही थोर मुस्लिमांची नावे व त्यांचे योगदान सहजपणे आमच्या नजरेसमोर आले आणि ते ऋण आपण स्वीकारावे, या भावनेने केलेला हा पत्रप्रपंच! मुख्यत: मुघल कालखंडात मुघल व इराणी स्थापत्यशास्त्राचा मनोहारी संगम त्या काळच्या इमारती, किल्ले, मशिदी, राजवाडे इत्यादींमध्ये दिसून येतो. जगप्रसिद्ध कुतुबमिनार, लाल किल्ला, गोल घुमट आणि नितांतसुंदर ताजमहाल हे त्याचे नमुने, शेती हा भारताचा अनादी काळापासून उत्पन्नाचा कणा आहे उत्तर भारतात मुसलमान सल्तनीच्या कारकिर्दीत धरणे बांधली गेली, आणि कालवेही खोदले गेले. फिरोझशहा तुघलकने यमुनेतून थेट हिस्सारपर्यंत कालवा खणला. दारा शुकोहने बागायती शेतीवर ग्रंथरचना केली. मोठ्या सैन्याच्या हालचालीसाठी उपयोगी पडावे म्हणून रुंद, सरळ रस्ते मुघलांनी बांधले, रस्त्यावर पाणपोया, सराया आणि अंतर दाखविणारे कोस मिनार बांधले. दरबारातल्या रोजच्या व्यवहाराच्या नोंदी लिखित स्वरूपात करायची पद्धत त्यांचीच. अजूनही वापरात असलेला, शेरशहा सुरीने बांधलेला ग्रँड ट्रंक रोड हे मुघल दूरदृष्टीचेच उदाहरण आहे. भारताच्या सशस्त्र सेनेत एअर मार्शल लतीफ, ले. जनरल सुलतान मेहमूद, जनरल सामी खान, जनरल अफसर करीम, जनरल फारूख भट्टी, जनरल हबीबुल्ला यांनी आयुष्य खर्ची घातले. आपल्या २१ 'परमवीर चक्र' विजेत्यांपैकी एक अब्दुल हमीद या तरुणाने देशासाठी बलिदान केले. 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' लिहिणारे इक्बालदेखील याच समाजातले. अध्यात्मात वैचारिक फरक असला तरी सूफी संतांनी या दोन विचारसरणी जवळ आणण्यात मोलाची भर घातली. हिंदू भक्तिपंथ आणि सूफी तत्त्वज्ञान यांत बरेच साम्य असल्याने, त्यांचा एकमेकांवर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येते. सलीम चिस्ती, निजामुद्दिन अवलिया, कबीर यांचे कार्य अलौकिक आहे. मराठी संतांमध्ये मुंतोजी, शेख मोहंमद, हुसेन अंबरखान, लतीफ शहा इत्यादी मुस्लीम संतांनी भक्तीपर काव्यरचना केल्या आहेत, त्यात विठ्ठलभक्ती आणि गीतेचे निरूपण दिसून येते. इस्लामने काही खास चिजा भारतास दिल्या, त्यांपैकी एक म्हणजे संगीत, त्याने भारतीय संगीताला एक इराणी साज चढविला, सारंगी ही त्यांचीच खासियत, काव्य-संगीताला उत्तरेत राजाश्रय मिळाल्याने या कलांचा झपाट्याने विस्तार व प्रगती झाली. लखनौचे नबाब वाजिद अलि शाह स्वत: संगीतज्ञ, ज्ञानी होते, ठुमरीचा उदय ही त्यांची देणगी, अल्लाउद्दिनाचे दरबारी अमीर खुस्रो यांनी खयाल गायकी रुजविली, यांच्याच दरबारी ध्रुपद गायकी बहरली, जी आजपर्यंत डागर बंधूंनी टिकविली आहे. मुघल दरबारात असलेल्या तानसेनचे योगदान अनन्यसाधारण आहे. आजही संगीत, काव्यक्षेत्रातील मिर्झा गालिबांपासून, कैफी आझमी, मजरुह सुलतानपुरी, नौशाद, खय्याम, जावेद अख्तरपर्यंत अनेक दिग्गजांची नावे सांगता येतील. समाजकारणात व राजकारणात मौलाना अब्दुल कलाम आझाद, न्यायमूर्ती छागला, न्यायमूर्ती हिदायतुल्ला, न्यायमूर्ती फातिमा बीबी, माजी राष्ट्रपती झाकिर हुसेन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अशी गुणी व्यक्तिमत्त्वे याच समाजाने दिली, क्रीडाक्षेत्रात टेनिसपटू घोस महंमद, सानिया मिर्झा दिले. पतौडीचे नबाब, मुस्ताक अली, अझरुद्दिन, इरफान पठान, झाहिर खान यांसारखे जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू दिले. बॉलिवूडचेतर पानही 'खानां' वाचून हलत नाही. डॉ. सलीम अली यांच्यासारखा ख्यातनाम पक्षितज्ज्ञ दिला. एम. एफ. हुसेन, रझा यांच्यासारखे जगप्रसिद्ध चित्रकार दिले. भारतीय सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील या समाजाचे योगदान प्रश्नातीत आहे. शेवटी या समाजाचे योगदान किती, व दुसऱ्या समाजाचे किती, अशी तुलना करू नये, गुणी माणसे सर्व समाजांत असतात व लहान-मोठ्या समाजांचे आपापल्या परीने राष्ट्राच्या घडणीत योगदान होतच असते, सुमन किर्लोस्कर, लका कि, मॉडेल कॉलनी, पुणे सुरेश पिंगळे, पिंगळे फार्म्स, कोरेगाव पार्क, पुणे (दिवाळी २००८) निवडक अंतर्नाद ४९५