पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आल्यावर रशियनांना दुकानांबाहेरच्या जाहिराती बघून आनंदच व्हायचा. त्या जाहिराती रशियन भाषेतच असायच्या, 'व्होडका घ्या, स्वस्तात उपलब्ध'! अमेरिकन, चिनी बनावटीचे कपडे, डबाबंद भाज्या, दूध, चीज, लोणी, यांच्याबरोबर इलेक्ट्रिकच्या शेगड्या, इस्त्र्या, मिक्सर्स अशा वस्तूही तिथे खूप स्वस्तात उपलब्ध केल्या गेल्या होत्या. खलैविना नावाच्या नर्स बाईने स्वेटलानाला लिहिलेल्या पत्रात म्हटलेय, 'माझ्यासारख्या हजारो बायका होत्या तिथे. आम्ही सैनिक नव्हतोच. तिथल्या लालक्रांतीबद्दल सांगून सरकारने आम्हाला तिकडे पाठवलं होते. तिथल्या गरीबांसाठीच तिकडे जायचं होतं. त्यांच्या मदतीसाठी त्यावर आमचा विश्वास बसला. पण तिथं गेल्यावर लक्षात आलं की तिथं सगळं काही विकायलाच काढलं होतं. स्वयंपाकिणी, नर्सेस, मदतनीस, मोलकरणी म्हणून आम्ही गेलो होते. आमची कामं तर आम्ही मनापासून करीत होतोच, पण आमच्या कामाची दखलच न घेता, आम्हालाही 'विकायलाच काढलं होतं. तेही आमच्याच लोकांनी आमचा गैरवापर केला त्यांनी आमचं स्वतःचं असं काही शिल्लकच राहिलं नाही आमच्याजवळ आम्हाला जणू नाहीसच केलं त्यांनी ' आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीला स्वेटलाना म्हणतात, "एक दिवस एका रशियन माणसाचा फोन आला. तो म्हणाला, 'तुम्ही आमच्यावर आमच्याबद्दल पुस्तक लिहिणार आहात. पण शांततावादी, मानवतावादाची भाषा बोलणाऱ्यांचा मी किती तिरस्कार करतो हे तुम्हाला कधी कळणारच नाही, तुम्ही कधी जाडेभरडे, संपूर्ण शरीर झाकणारे लष्करी कपडे घातलेत ? त्यावर कायमच अंगावर असणारी वजनदार शस्त्रं सांभाळत टळटळीत उन्हात वाळवंटातून जीप चालवलीत? उंचच उंच पर्वत चढलात ? उत्तम व्हायोलीन वाजवणारा माझा एक मित्र होता. त्या मित्राचं मस्तक उडवून, हात-पाय कापून टाकलेलं धड एका पेटीतून परत आणलं होतं! त्याचं दफन झालं आणि त्याच्या आईला वेड लागलंय, सैनिक आम्ही आहोत, आम्ही लढलोय आणि तुम्हाला दहा वर्षांनंतर जाग आलीय! हुशारच आहात तुम्ही ! बंदुकीतून उडणारी गोळी म्हणजे काय ते तुम्हाला कधी कळणारच नाही. तुमच्या त्या बायबलमधील सत्याला मी कवडीची किंमत देत नाही. माझी सत्यं आहेत ती म्हणजे प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीतून आणलेली माणसांची मस्तकं, त्यांचे हात-पाय. तेच माझं सत्य आहे. नाहीच कळणार ते तुम्हाला. ' 22 सैनिक तशा अवस्थेत परत येत होते, त्याचे दुःख तर अपरंपार होते. पण त्याचबरोबर आपल्या देशासाठी, अफगाणिस्तानातल्या गरिबांसाठी त्यांचा बळी गेलाय त्याचा अभिमानदेखील वाटला होता. त्यांना कौतुकाने 'अफगाणीसा' म्हटले जाऊ लागले होते. पण नंतर जसजसे एकूणच भयानक वास्तव समजायला लागले तसतसा लोकांचा संताप वाढतच गेला. आपल्या सरकारचा आलेला संताप दाखवणे अशक्य होते, कारण सरकारची भीतीच होती. म्हणून मग परत आलेल्या सैनिकांचा, मग ते अपंग होऊन आले असले तरीही, ४०८ निवडक अंतर्नाद त्यांचा संताप येऊ लागला. 'तुम्ही खुनी आहात, काय काय आणलंत लुटून त्या गरिबांकडून?' असे प्रश्न विचारून त्यांचा अपमान होऊ लागला. परत आलेल्यांपैकी अनेकांची मानसिक अवस्था तर पराकोटीची बिघडली होती. अनेक मनोरुग्ण झाले, त्यांना औषधोपचार घ्यावे लागत होते, काही जण तर वेडेच झाले. पुष्कळ सैनिक स्वतःला खुनी समजू लागले होते. हे सगळे जगभर पसरायला वेळ लागला नाही. आपण हे युद्ध फार काळ चालवू शकणार नाही याची जाणीव लवकरच रशियाला झाली. दहा वर्षांनंतर जिनिव्हा करार झाला आणि रशियाने आपले सैन्य काढून घेतले. त्यामागे अमेरिकेचाही हात होताच, कम्युनिस्टांचा द्वेष करणाऱ्या इस्लामवाद्यांना अमेरिकेने हाताशी धरले होते. अफगाणिस्तानच्या सीमेला चिकटून असलेल्या पाकिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष होता जनरल झिया उल हक, हा तर कट्टर इस्लामवादीच, त्यालाही रशियाची भीती वाटायला लागली होतीच. त्याच्याही मनात रशियाबद्दलचा द्वेष होताच अमेरिकेने झियाशी संधान बांधले. अब्जावधी डॉलर्स आणि अपरंपार शस्त्रास्त्रांचा साठा पाकिस्तानकडे पोचवला आणि पाकिस्तानमध्येच कट्टर इस्लामवादी तयार करण्याचे, कम्युनिस्टांना विरोध करण्यासाठीचे क्लासेसच सुरू केले. त्या सगळ्याला जनरल झियाने खुल्या मनाने स्वीकारले, ओमर अब्दुल रहमान, अल जवाहिरी, मुल्ला ओमर अशा अनेकांना 'तयार' केले. मुल्ला ओमर हा एका डोळ्याने आंधळा, म्हणून 'आंधळा शेख' म्हणूनच ओळखला जात होता. त्यानेच बामियानच्या बुद्धांना सुरुंग लावून उद्ध्वस्त केले होते. या विशाल ऐतिहासिक मूर्तीचा उपयोग जाणारे येणारे अफगाण टोळीवाले नेमबाजीचा सराव करण्यासाठी वापरत. पुढे त्यांनी त्या जमीनदोस्तच केल्या. त्यांवरचा सोन्याचा वर्ख व मौल्यवान अलंकार लुटले गेले. त्या सगळ्यांच्या पाठीशी होता मुल्ला म्हणजे धनाढ्य अरब - ओसामा बिन लादेन, अमेरिकेच्या मदतीने निर्माण केलेली ही शक्ती एवढी वाढत गेली की अफगाणिस्तानातील सुरुवातीचे मुजाहिदीन नंतर तालीबानी झाले, 'अल कायदा' झाले. त्याची शक्ती एवढी वाढत गेली की त्याची किंमत अमेरिकेलाच चुकवावी लागली. रशियन सैन्य परत गेले असले तरी रशियाच्या आशीर्वाद आणि आधारानेच चालणारे अफगाण सरकार सत्तेवर होते. अमेरिकेची लुडबूड वाढत गेली आणि १९९२ साली कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजिबुलाचा अपरंपार छळ करून याच अतिरेक्यांनी त्याला काबूलमधल्या झाडाला टांगून ठेवले. मुजाहिदी, तालीबानी असा प्रवास करीत अल कायदाने • अफगाणिस्तान ताब्यात घेतले. मूलभूत इस्लामवादी सरकार सत्तेवर आले. अफगाणिस्तानचे पूर्णपणे इस्लामीकरण झाले. कित्येक अफगाणांना हे इस्लामीकरण असह्य होते. त्यांचे आणि अमेरिकेचे संबंध वाढू लागले. इस्लामवाद जगभर पसरू लागला होता. २००१ साली न्यूयॉर्कच्या दीन टॉवर्सवर हल्ला झाला. या जुळ्या इमारती म्हणजे अमेरिकेचा मानबिंदू