पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समजल्या जायच्या. वॉशिंग्टन राजधानीमधील लष्करी कचेरीवरदेखील हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. न्यूयॉर्कमधील जुळ्या इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या; पण वॉशिंग्टनमधील इमारतीवर झालेल्या हल्ल्याचा नेम चुकला होता. शेकडो लोक मरण पावले होते. हा हल्ला म्हणजे मानबिंदूवरचा हल्ला होता असे अमेरिकेला वाटले. या हल्ल्याचा सूत्रधर ओसामा बिन लादेन असणार याची त्यांना खात्रीच होती, म्हणून पाकिस्तान - अफगाणिस्तानात येरझरा घालणाऱ्या ओसामाला ताब्यात द्या अशी मागणी केली अमेरिकेने ती मागणी पूर्ण झाली नाहीच. त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानात सैन्य घुसवले. त्यासाठी ब्रिटन, कॅनडा यांचाही प्रत्यक्षात पाठिंबा होताच. रशियन सैन्य घुसले होते तेव्हा काही अफगाणांनी त्यांचे स्वागत केले होते, त्याच पद्धतीने या वेळीदेखील दुसऱ्या बाजूच्या अफगाणांनी अमेरिकन सैन्याचे स्वागत केले. या वेळी स्वागत करणाऱ्यांची संख्या खूप अधिक होती. कारण तालीबानी, अलकायदा यांच्या अमलाखाली असलेल्यांचे जगणे त्यांना असह्य झाले होते. इस्लामी कायद्याशिवायचे इतर सगळे संदर्भ त्यांच्या जीवनापासून तोडले गेले होते. म्हणूनच त्यांनी अमेरिकन सैन्याचे स्वागत केले होते ते मनापासूनच, अमेरिकेने तालीबानी, अल कायदाला दूर करून टाकले. आणि 'लोया जिरगा' या सगळ्या येळीवाल्यांच्या नेत्यांच्या सभेमध्ये मतदान झाले. हमीद करझाई राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. हळूहळू स्थैर्य आले. सर्वसामान्यांना आता रोजच्या जगण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्य मिळू लागले. दूरचित्रवाणीवरची मुल्लामौलवींची सततची भाषणे बंद झाली, गाणी, चित्रपट, नाटके सुरू झाल्या मुलांसाठीच नाही तर मुलींसाठीदेखील शाळा सुरू झाल्या. काबूल विद्यापीठ चालू झाले. काबूलमध्ये तरी काही स्त्रियांनी संपूर्ण बुरखे न घालता हिंडा-फिरायला सुरुवात केली. दुकाने जगभरच्या वस्तूंनी, पुस्तकांनी भरली, तालीबानींच्या धास्तीमुळेच अफगाणिस्तानाचा अडीच-तीन हजार वर्षांपूर्वीचा सांस्कृतिक खजिना जमिनीखाली पुरून ठेवला होता, तो बाहेर काढला. हिंदू-बौद्ध देवदेवतांच्या सुंदर मूर्ती, दागदागिने, भांडी- कुंडी, चित्रे, हस्तलिखिते, वस्तुसंग्रहालय पुन्हा सुरू करून मांडून ठेवले. संगीताच्या टेप्स बाहेर आल्या. संगीताची वाद्ये पुन्ह्य वाजू लागली. अमेरिकेने हळूहळू सैन्य माघारी घ्यायला सुरुवात केली. आजच्या घटकेला त्यांचे दहा- बारा हजार सैन्यच आहे, तेदेखील काबूल शहरात भोवतीने तालीबानींचा जोर मात्र वाढतच आहे. मधल्या काळात अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारून टाकले होते तरी तालीबान, अलकायदाने आपले हातपाय पसरलेच आहेत. आजही अफगाणिस्तानामध्ये दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. परधर्मी, परकीयच नाहीत तर स्वकीयांनादेखील कट्टरवादी मारत सुटले आहेत. अफगाणिस्तानचे पाकिस्तान, रशिया, अमेरिकेशी असलेले संबंध उघड झाले. भारताशी कसे होते संबंध ? कसे आहेत? आमचाच अनुभव सांगते. ही घटना आहे सौरक्रांती होण्याआधीची, आपला काका जाहीरशहाला हटवून दाऊदखान सत्ताधारी झाला. दाऊदखानला अफगाणिस्तानातील वर्षोनुवर्षे चालत आलेल्या परंपराग्रस्त कारभाराला नवे, शिस्तबद्ध, आधुनिक, लोकहितवादी वळण द्यायचे होते. म्हणून दाऊदखानने भारताकडे एक गुप्त प्रस्ताव मांडला. साधारण १९८० च्या सुमारास त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आपल्या नव्या लोकसत्ताकाची संपूर्ण आखणी, बांधणी, यांसाठी भारताने योजना आखून द्याव्यात, सरकारचा कारभार, व्यवस्थापनाची मांडणी करून द्यावी, प्रत्येक खात्याची आधुनिक नीटनेटकी पुनर्रचना करून द्यावी असा प्रस्ताव होता. इंदिरा गांधींनी संमती दिली. वेगवेगळ्या क्षेत्रांतील १२-१५ अधिकाऱ्यांना काबूलमध्ये पाठवले. त्यांनी अभ्यास सुरू केला. योजना आकार घेऊ लागली. ही बातमी रशियाला कळलीच! ब्रेझनेव्ह यांनी इंदिरा गांधींना संदेश पाठवला, 'अशी कोणतीही मदत भारताने अफगाणिस्तानला देऊ नये! ती जबाबदारी आमची आहे!' इंदिरा गांधी या संदेशाविरोधात जाऊ शकत नव्हत्या. दोन-चार दिवसातच सगळ्या अधिकाऱ्यांना भारतात परत जावे लागले. श्रीनिवासन हे त्यांच्यापैकीच एक अधिकारी, त्यांनी स्वतःच ही हकीगत सांगितली होती आम्हाला. दुसरी हकीगत आहे १९७८ सालची. सौर राज्यक्रांतीनंतर कम्युनिस्टांची सत्ता आली. नूर मोहम्मद तराकी हे राष्ट्राध्यक्ष होते. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपल्या नावातून 'मोहम्मदाला' काढूनच टाकले होते. परराष्ट्रमंत्री होते हफिजुल्ला अमीन. त्यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री होते अटलबिहारी वाजपेयी, ते काबूलला आले होते. सरकारशी बोलणी करायला. तेव्हा अमीनने त्यांच्यासमोर म्हणे एका गुप्त कराराचा प्रस्ताव मांडला होता. अमीननी वाजपेयींना सांगितले की तुम्ही तुमच्या बाजूचा अर्धा पाकिस्तान ताब्यात घ्या आणि आम्ही आमच्या सरहद्दीला लागून असलेला अर्धा भाग काबीज करतो! पाकिस्तान तुमचा शत्रू आहे व आमचाही शत्रूच आहे. ' वाजपेयींनी या कराराला अर्थातच मान्यता दिली नाही. ही कल्पना त्यांना हास्यास्पदच वाटली असावी. ही घटना आपल्या दूतावासातीलच एका अधिकाऱ्याने आम्हांला सांगितली होती. 'माझं नाव कुणाला सांगू नका' ही त्यांची अट होती, ते साहजिकच होते. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. अफगाणिस्तानच्या या सगळ्या इतिहासाचे वास्तवाचे विचार मनात कल्लोळ माजवतात. विचार, भावनाचे भिरभिरणे सुरूच, तेव्हा मनात आलेच की अमेरिकादेखील रशियाचे प्रतिबिंबच जणू रशियाने अफगाणिस्तानला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आजच्या काळातच नाही, तर अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले होते. पण त्याचा जबरदस्त अनुभव आला तो डिसेंबर १९७९साली, रशियाने अफगाणिस्तानात लष्करी घुसखोरी केली तेव्हाच, जगभरातल्या लहान, कमकुवत देशांवर ताबा मिळवण्यासाठीची ईर्ष्या जगभरच्याच महासत्तांच्या मनात निवडक अंतर्नाद ४०९