पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माया... माझ्या पराभवाचे नाव हेरंब कुलकर्णी मी स्वतः हा एक माझ्या धडपडीचा आठ वर्षे लढून झालेला पराभव मानत होतो. माझ्या पराभवातून एक विषण्णता मनात दाटली होती. स्त्री शिक्षणाची आकडेवारी सतत सांगताना, सावित्रीबाईंचा वारसा सांगताना एका वंचित मुलीला शाळेपर्यंत आणणे... तिला अत्याचारापासून वाचविणे किती कठीण आहे, हे मी गेली सात वर्षे अनुभवत होतो. मला गेली सात वर्षे छळणारे हे नाव, मला लागलेली साडेसाती असे कुणी म्हटले तरीही मला चालेल. मायाला शाळेत टिकवण्याचा प्रयत्न सतत गेली सात वर्षे करतो आहे; पण माया मला काही भीक घालत नाही. मी पुन्हा पुन्हा तिच्यापुढे हरतो आहे... शिक्षणाचा सक्तीचा कायदा तर तिच्या खिजगणतीतही नाही... मायाचा आणि तिच्या नातेवाइकांचा मला संताप संताप येतो... पुन्हा या कार्टीचे नाव घ्यायचे नाही म्हणून मी निर्धार करतो आणि पुन्हा एकदा ती मला कुठेतरी दिसतेच... पुन्हा मी उसने अवसान आणून तिला कुठल्या तरी शाळेत नेतो. पुन्हा ती बाहेर.... सात शाळा आजपर्यंत झाल्या, तरीसुद्धा अजूनही ती शाळेबाहेरच आहे... मी ८०० मुले शाळेत बसविल्याचे श्रेय घेतो, पण एका पारड्यात ८०० मुले दाखल केल्याचा माझा शैक्षणिक सामाजिक अहंकार आणि दुसऱ्या पारड्यात मायाला शाळेत बसविण्याचे माझे अपयश, पण तरीही हे मायाचे पारडेच खाली जाते... मला विलक्षण शरमल्यासारखे वाटते. कुठे भेटली मला ही माया... भेटलीच नसती तर किती बरे झाले असते... 'सर्व शिक्षा अभियानात काम करायला लागल्यावर वीटभट्टयांवर मी फिरायचो. आमच्या गावच्या नदीकाठच्या वीटभट्टीवर माया मला भेटली. या भट्टीवर काम करणाऱ्या माणसांची मुले शाळेत अपवादानेच जातात. मी तरीही गेलो. विचारले. भट्टीवर चार पाच मुले खेळत होती. मे महिना, रणरणते ऊन, समोर नदीचे वाहणारे पाणी. तितक्यात माया नदीतून पोहून तशीच ओल्या कपड्याने माझ्यासमोर आली. वय वर्षे सात. काळ्या कुळकुळीत रंगाची चिमुरडी माया चेहऱ्यावरून पाणी निथळतानाही डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरचा आनंदी भाव काही लपत नव्हत... ती परका माणूस बघत झोपडीत कपडे बदलायला पळाली. तिच्यासोबत होता सुरेश तिच्याच वयाचा सुरेश तोही ओलाचिंब भिजलेला. नदी घरासमोर वाहत असणे एवढी एकच गोष्ट त्यांना श्रीमंती वाटत होती. सारी गरिबी, दैन्य विसरायला लावायला पुरेशी होती... अतिशय आनंदाने ते पाण्यात खेळत होते. थोड्या वेळाने सगळी लहान मुले एकत्र केली. शाळेत ३९२ निवडक अंतर्नाद कुणीच जात नव्हते, भट्टीमालकाला बोललो. तोही जून महिन्यात शाळेत घालायला तयार झाला. पालकही तयार झाले... मे महिन्यात आमच्या ऑफिसातही फारसे काम नव्हते, तेव्हा मी व माझ्या बायकोने ठरविले, की आपण रोज यांना शिकवायचे. तेवढीच शाळेची तयारी होईल. आम्ही जाऊ लागलो. आमचा मुलगा बरोबर मायाच्याच वयाचा. त्यामुळे तोही येऊ लागला. त्यालाही हे मित्र मिळाले. पहिला काही वेळ या सर्वांना गोळा करण्यात जायचा, माया आणि सुरेश हमखास पाण्यात पोहत असायचे. पाण्यात अंघोळ करणाऱ्या या गर्दीतून त्यांना शोधून काढणे जिकीरीचे असायचे. आम्हांला बघितले, की दोघेही पाण्यात सूर मारायचे आणि पाण्याखालून पोहत लांब निघून जायचे आणि लांब जाऊन हसायचे... आमची गंमत करायचे... ओरडून कसेतरी त्यांना कडेला आणायचे. कडेला येताना ते आमच्या पाण्याला घाबरणाऱ्या मुलाची गंमत करायचे. त्यांच्या अंगावर पाणी उडवायचे, त्याला कधीकधी पाण्यात ओढायचे, तो घाबरून ओरडला की मोठ्याने हसायचे... त्याला सूर मारून दाखवायचे आणि पाण्याखाली बराच वेळ राहून वर येताना मासा घेऊन यायचे... मासा शोधून आणून दाखविणे हा रोजचाच खेळ होता. मला त्यांचे कौशल्य बघितले की आपण आपली मुले सुरक्षिततेच्या नावाखाली किती बनचुकी करतो आहोत असेच वाटायचे. आपला मुलगा पोहू शकत नाही आणि ही मुले कुणीच न शिकवता पलीकडच्या तीरावर जातात... माया, सुरेश काठावर आले, की नंतर वीटभट्टीवर आमची शाळा सुरू होणार सर्वांना पाट्यांवर गिरवायला शिकवायचो. मला खूप प्रयोगशील शाळा बघितल्यावर आता प्रत्यक्ष कार्यवाही करून बघायला मिळत होती. तेव्हा वाचन, लेखन शिकविण्याच्या नव्या नव्या पद्धती मी वापरून बघायचो आणि चक्क ही मुले वाचनाच्या दिशेने प्रगती करायला लागली. मायाचे कुटुंब म्हणजे एक प्रश्नचिन्हच होते. मायाच्या जन्मानंतर मायाच्या वडिलांनी तिच्या आईला सोडले. आईचे आता हे दुसरे लग्न, मुलाच्या आशेने या नवऱ्याकडून तिला पाच मुली रांगेने झाल्या, मायासह एकूण सहा बहिणी, मायाच्या आईचे