पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत. त्यांची वीज निर्माण करण्याची क्षमता खूप कमी आहे, पण या अणुभट्ट्यांमधून आपण अणुभट्ट्या कशा उभारायच्या आणि कशा वापरायच्या हे शिकलोय. आणखी एक आहे, थोरियमचे फार समृद्ध साठे भारतात आहेत. आपल्या कल्पक्कम येथील प्रायोगिक अणुभट्टीत आपण यशस्वीपणे थोरियम वापरलेय. त्यामुळे जैतापूरला आपण फ्रान्समधून ज्या अणुभट्ट्या आणणार आहोत, त्या तिसऱ्या टप्प्यात आपण भारतातील थोरियम वापरू शकू. आपले थोरियम आपल्याला महासत्ता बनवू शकेल. तंत्रविज्ञानातील प्रत्येक प्रगतीत माणूस धडपडतो, पडतो; पण त्यातून काही नवे शिकून पुढे जातो. अमेरिकेत थ्री मायलर आयलंड झाले. रशियात चेर्नोबिल, पण त्या देशांनी अणुऊर्जेचा त्याग केला नाही. ते त्या अपघातातून शिकले आणि पुढे गेले. आज भारतात आपण एकत्रितपणे जेवढी वीज बनवतो, त्याहून अधिक हे दोन देश अणुऊर्जेतून बनवतात. फ्रान्समध्ये ८७ टक्के वीज अणुऊर्जेतून मिळते किंवा फ्रान्स ६३ हजार मेगावॅट वीज अणुभट्ट्यांतून मिळवतो. अणुभट्टीभोवतालचा जो फार मर्यादित विभाग प्रतिबंधित क्षेत्र व संरक्षित क्षेत्र म्हणून सोडलेला असतो किंवा सोडावा लागतो, त्यापलीकडील क्षेत्रातील किरणोत्सर्ग अजिबात वाढत नाही किंवा या विभागातील किरणोत्सर्ग अणुभट्टी कार्यान्वित होण्यापूर्वी सहा वर्षे आधीपासून दररोज मोजला जातो. दगड, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणूस या सर्वांवर तो मापला जातो आणि अणुभट्टी कार्यान्वित झाल्यावर तो कायम दररोज असाच मोजावा लागतो. जगातील ४३० आणि भारतातील सर्व २० अणुभट्ट्यांमध्ये हे अनिवार्य असते. महत्त्वाचे म्हणजे अगदी माहितीचा अधिकार न वापरतासुद्धा ही नोंदवलेली माहिती त्या अणुभट्टीवर कोणासाठीही पाहण्यासाठी उपलब्ध असते. जगातील ४३० आणि भारतातील २० अणुभट्ट्या स्थापनेपासून आजपर्यंत भोवतालच्या वातावरणातील किरणोत्सर्ग अजिबात न वाढवता कार्यरत आहेत. न घेता चीन त्यांचे जलविद्युत प्रकल्प करतोय. आपण असे करावे, की नाही हा वादाचा मुद्दा आहे. समजा हे आपण असे पुरे केले, तरी ३३० हजार मेगावॅट वीज आपणाला बनवावी लागेल. त्यासाठी कोळसा आणि अणुऊर्जा एवढेच दोन मार्ग आपल्यासमोर आहेत. आपण जर एक हजार मेगावॅट वीज कोळशापासून बनवणार असू, तर आपल्याला ७० हेक्टर जागा लागेल आणि दरवर्षी आठ हजार रेल्वे वाघिणी लागतील, म्हणजे दररोज २०० ते ३०० कोळशाच्या वाघिणी लागतील, त्यातून हा कोळसा परदेशातून आणावा लागेल. त्यासाठी बंदराची सोय लागेल. मात्र एक हजार मेगावॅट वीज अणुभट्टीतून बनवायची असेल, तर फक्त २० हेक्टर जागा लागेल, एका वर्षात २७ टन इंधन लागेल. त्यातून काही काळाने आपण सध्याचेच इंधन पुन्हा वापरू शकतो किंवा भारतातील थोरियम त्याच अणुभट्टीत वापरू शकतो. " या देशात कार्यकर्त्यांनी एक नवी टूम, नवी फॅशन सुरू केली आहे. आपण वीज वापरायची, सरकारने आणखी वीज निर्माण करावी, असा आग्रह धरावयाचा. मात्र आम्हांला 'औष्णिक वीज नको, त्यामुळे वातावरणात दूषित वायू पसरतात; आम्हांला 'किरणोत्सर्गी वीज नको, त्यामुळे किरणोत्सर्गाचा धोका आहे; आम्हांला 'जलविद्युत' नको, त्यामुळे जंगले पाण्यात जातात, असे म्हणायचे. वीज बनविण्याचे हे तीनच व्यावहारिक पर्याय जगासमोर आहेत. म्हणजे या कार्यकर्त्यांना नक्की काय हवेय?" अणुभट्ट्या सुरक्षित आहेत आणि अणुभट्ट्या ही भारताची निकडीची गरज आहे. आपण अगदी महासत्ता वगैरे बनण्याची स्वप्ने न बघता किमान गरजेचा विचार केला तरी इसवी सन २०५० पर्यंत आपणाला ४०० हजार मेगावॅट वीज लागेल. आपण भारतात जलविद्युत बनवू शकतो, तेवढी आपण बनवली आहे. अर्थात, या विधानातही ग्यानबाची मेख आहे कारण आपण भारतात आणखी ६७ हजार मेगावॅट जलविद्युत बनवू शकू. पण आज प्रगत देशांनी पर्यावरणाचे जे जागतिक मानदंड तयार केले आहेत, त्यामुळे आपण हे प्रकल्प हातात घेऊ शकत नाही. हे असे पर्यावरणीय मानदंड बनवण्यापूर्वीच अमेरिकेने त्यांचे जलविद्युत प्रकल्प पुरे केलेत आणि हे पर्यावरणीय मानदंड अजिबात मनावर आणखी एक गोष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो, की दरवर्षी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या वायुमुळे ३० लाख माणसे मृत्युमुखी पडतात. आज आपल्याकडे चंद्रपूर, परळी, पारस येथे जी औष्णिक वीजकेंद्रे आहेत, तेथील परिस्थिती काय आहे, हे आपणाला माहिती आहे त्यातून त्यांच्यासाठी वर्षाला दोन कोटी टन कोळसा लागतो, आपण जर ४०० हजार मेगावॅट वीज कोळशापासून बनवायची ठरवले, तर आपल्याला दरवर्षी परदेशातून १६० कोटी टन कोळसा आयात करावा लागेल आणि आपण आपले अणुऊर्जा प्रकल्प 'किरणोत्सर्गाचे काय या शब्दांच्या भूलभुलैय्यात अडकवून ठेवलेत! आपण विसरलोय जगातील सारे देश फार मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा बनवताहेत. खरेतर आपण अमेरिका, फ्रान्स यांच्यापेक्षा खूप अधिक भाग्यवान आहोत. अणुभट्ट्यांचे काही प्रमाणात आजचे, आणि पुढेतर जवळजवळ संपूर्ण इंधन थोरियम आहे थोरियमचे सर्वात समृद्ध साठे भारतात आहेत. जैतापूरलापण तिसऱ्या टप्प्यात आपण भारतातील थोरियम इंधन म्हणून वापरणार आहोत. नीट आखणी केली तर यापुढे भारतातील प्रत्येक अणुभट्टीत आपण भारतातील थोरियम इंधन म्हणून वापरू शकू - झाले ते एवढेच. नर्मदा प्रकल्पाप्रमाणे जैतापूरलापण विरोध करीत आपण उभे आहोत. आपण आपल्या समृद्धीचा 'लॉग इन आयडी' आणि 'पासवर्ड' विसरलोय आणि आपली प्रगती रोखणाऱ्या परकीय शक्तींना ते नेमके माहीत आहेत. (मार्च २०१५ ) निवडक अंतर्नाद ३९१