पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग असा, की कुठल्याही भाषेला जर आज पुढे जायचं असेल तर ती केवळ साहित्याची आणि काव्याची भाषा असणं पुरेसं नाही, तसंच ती केवळ बोलीभाषा असणं पुरेसं नाही, तर ती ज्ञानभाषा असायला पाहिजे. स्वभाषेतून नवीन ज्ञानाची निर्मिती, जुन्या ज्ञानाशी तिची जोड, नव्या आणि जुन्या ज्ञानाचा मेळ घालत वाढत जाणारा जो स्वभाषेतला ज्ञानसाठा आहे त्याचं समाजाच्या सर्व स्तरांमध्ये तत्काळ मुक्त वितरण, तसंच आर्थिक व सामाजिक विकासासाठी या ज्ञानाचं सर्वसामान्यांनी सातत्यानं केलेलं उपयोजन या बाबी महत्त्वाच्या आहेत. कारण आर्थिक- सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी स्वभाषेतल्या ज्ञानाचा वापर करता येण्याच्या संधी सर्वसामान्य समाजाला कितपत आहेत, यावरून त्या भाषेचं भवितव्य स्पष्ट होतं. केवळ साहित्य, कला आणि संस्कृती यांची किंवा करमणुकीची भाषा राहून तिचं भविष्य उज्ज्वल राहतंच असं नाही. विज्ञान तंत्रज्ञान अरेबिकमध्ये शिकवायचं असेल किंवा चायनीजमध्ये शिकवायचं असेल, तर त्यांच्याकडे सर्व शब्दसंपदा उपलब्ध आहे. तंत्रज्ञानातला अगदी प्राथमिक भाग जरी शिकवत असलात, तरी प्रतिशब्द आमच्याकडे नाहीत म्हणून अनाकलनीय अशा प्रमाणभाषेतील शब्दांनंतर कंसात आम्ही इंग्रजी शब्द छापू, अशी वेळ त्या समाजांवर येत नाही. प्रगत ज्ञानक्षेत्रातली सुद्धा सुलभ शब्दसंपदा त्या भाषांकडे आहे. पण आमच्याकडे ठायी ठायी इंग्रजी शब्द वापरावे लागतात. आम्हांला त्याचं तत्त्वज्ञान करावं लागतं. मग आम्ही असं म्हणतो, की ग्रामीण मराठी जनतेसाठी संगणक हा इंग्रजी शब्द आहे आणि कंम्प्यूटर हा मराठी शब्द आहे! हे आम्हांला सांगावं लागतं याचं कारण आम्ही आमच्या भाषेला सुलभ अशी ज्ञानभाषा बनवण्यात कमी पडत आहोत. त्याला अगदी दैनंदिन ज्ञानभाषा होती, तिला आम्ही अभिजनांच्या भाषेमध्ये प्रवेशच दिला नाही, मानाचं स्थान दिलं नाही. श्रमाधिष्ठित अशा त्या सर्व व्यवहारांसंबंधी व त्यातील जिवंत अशा ज्ञानभाषेसंबंधी अभिजनवर्गानं उदासीनता किंवा तिरस्कार दर्शवला. परा विद्यांची भाषा अभिजनांची व अपरा विद्यांची भाषा बहुजनांची, अशी दरी निर्माण झाली. जगात विज्ञान तंत्रज्ञानाच्या अपरा विद्यांचा उदय ज्या १९व्या व २०व्या शतकात झाला व त्या विकासाच्या स्रोत बनल्या, त्या काळात आमच्या अभिजनवर्गाच्या भाषा त्या विद्यांच्या व्यवहाराला अपरिचित असल्यामुळे कालबाह्य ठरल्या व इंग्रजीची अपरिहार्यता अधोरेखित झाली. अभिजन व बहुजनांच्या अनुक्रमे डोक्याच्या व हाताच्या व्यवहारांमधली दरी अखेरीस आमच्या प्रमाणभाषेला नैसर्गिकपणे आणि लोकव्यवहारातून विज्ञान तंत्रज्ञानाची परिभाषा निर्माण करण्यासाठी सक्षम ठेवू शकली नाही. प्रमाणभाषा बनवण्याची मक्तेदारी अभिजनांकडे एकवटल्यावर दुसरे काय होणार ? इतर अनेक देशांनी नेमकी ही चूक करण्याचं टाळलं. प्रत्यक्ष वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक व्यवहार जे करत होते व त्या लोकांची जी रोजची व्यवहाराची भाषा होती, तीच थोडेफार उचित संस्करण करून प्रमाणभाषेच्या रूपात त्यांच्या आजच्या वैज्ञानिक शब्दकोशांमध्ये आहे. हा केवढा मोठा फरक आहे! समाजातल्या सर्वांत तळातल्या स्तरामधला हा मुलगा, भाषेचं कुठलंही बंधन नसल्यामुळेच एका श्रेष्ठ शास्त्रज्ञाची भाषणं लिहू शकतो; शोध लावू शकतो; ते जाहीररीत्या मांडू शकतो; नुसतंच बुक - बाइंडिंग करत बसत नाही. आमच्या समाजात जर असा एखादा मायकेल फॅरेडे जन्माला आला असता, तर तो सुरुवातीला बुकबाइंडर असता आणि शेवटी बुकबाइंडर म्हणूनच रिटायर झाला असता! याचं कारण त्या शास्त्रज्ञाची भाषा आणि या बाइंडरची भाषा यांचा काही मेळच नाही, संबंधच नाही. त्यामुळे वैज्ञानिक व्यवहारात ज्ञानाच्या पातळीवर बहुजनांनी सहभागी होण्याचा प्रश्नच नाही. भारतातील वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये आजही हेच चित्र कायम आहे. इतिहास बघितला तर एकेकाळी मोठ्या प्रमाणात धातूंमध्ये काम करणारे आमचे कारागीर होते, आमच्याकडे नवीन वास्तुरचना करणारे कितीतरी असे उत्तम कारागीर होते, की ज्यांनी ताजमहालसारख्या आश्चर्यजनक वास्तू बांधल्या, कैलाससारखी जगाला आकर्षित करणारी अद्वितीय लेणी कित्येक पिढ्यांनी पुढच्या पिढीकडे ज्ञान संक्रमित करत करत बांधली. पण अशा लोकांना आम्ही समाजाच्या मुख्य ज्ञानप्रवाहामध्ये वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ म्हणून प्रतिष्ठा दिली नाही. त्यांची, तसेच कोट्यवधी शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, बलुतेदारांची जी कामाची, व्यवहाराची ३८० निवडक अंतर्नाद चौथी नापास झालेला, एक गरीब तरुण हा विख्यात शास्त्रज्ञ सर हफ्रे डेव्ही ('डेव्हीचा रक्षकदीप वाले ) यांचा बुक बाइंडर होता. एक दिवस सर इंफ्रे त्याला म्हणाले, "तू माझ्या व्याख्यानांचं बुकबाइंडिंग करतोस, अलीकडे माझी व्याख्यानंसुद्धा ऐकून स्वतः लिहितोस, तर तू आता माझ्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोगपण कर." आणि मग दुपारच्या जेवणाची भ्रांत होती अशा घरातला हा मुलगा, त्या प्रयोगशाळेत प्रयोग करू लागला आणि कालांतराने त्याने एक विलक्षण शोध लावला. त्या वेळेला इंफ्रे डेव्ही त्याला म्हणाले, "तू रॉयल सोसायटीपुढे भाषण कर, तुझा हा शोध सर्व शास्त्रज्ञांपुढे मांड.” मग त्याने आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्डक्शनचा शोध मांडला, की ज्याच्यामुळे पृथ्वीवर आज रात्रीसुद्धा दिवस करता येतो. हे दिवे ज्याच्या संशोधनामुळे लागतात, तो मुलगा इंग्लंडच्या रॉयल सोसायटीमध्ये सर्वांच्या समोर येतो, आणि आपला संपूर्ण शोध हा प्रयोगाच्या साहाय्याने मांडून दाखवतो! त्यावेळेला समोर कोण बसलेले असतात? तर ब्रिटनचे अर्थमंत्री, चॅन्सलर ऑफ एक्सचेकर! ते त्याला विचारतात, "याचा काय उपयोग आहे? लोहचुंबक तारेच्या वेटोळ्यातून पुढे मागे हलवलं