पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वराला संस्कृतमधून पत्रे पाठवीत असे. त्यालाही थोडेफार संस्कृत येत होते. ती पत्रे घेऊन जाणाऱ्या सेवकांना मात्र संस्कृत येत नसल्यामुळे मधल्यामधे ती पत्रे उघडून वाचण्याचा त्यांचा खयटोप वाया जात असे! सोळासतराव्या शतकापासून आजवर झालेले संस्कृतचे अध्ययन आणि संशोधन यांचा इतिहास मनोरंजक आहे. थोडक्यात एवढेच म्हणता येईल, की संस्कृतच्या आंतरिक आणि संपादित गुणसंपदेमुळेच संस्कृतला आज जगात प्रतिष्ठा आहे. व्हिएन्नामध्ये चरकसंहितेच्या आणि न्यायसूत्रांच्या चिकित्सित संपादनाचा प्रकल्प, हाले विद्यापीठात मोक्षोपाय शास्त्र या ग्रंथाच्या चिकित्सित संपादनाचा दीर्घकाळ चाललेला प्रकल्प, बर्कले विद्यापीठात रामायणाच्या सर्वांगीण अभ्यासाचा प्रकल्प, जपान आणि फ्रान्स या देशांत प्राचीन भारतीय गणित आणि खगोलविज्ञान या शास्त्रांवर चाललेले संशोधन आणि कितीतरी अभ्यासकांचे वेगवेगळ्या संस्कृत ग्रंथांच्या सखोल अध्ययनाचे वैयक्तिक प्रकल्प ही काही मोजकी उदाहरणे संस्कृतला मिळणाऱ्या प्रतिष्ठेची निदर्शने आहेत. पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठात असलेल्या सुमारे सा हजार संस्कृत हस्तलिखितांची सूची करून ती अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासाठी व्हिएत्रा आणि द. कोरियामधील विद्यापीठांनी संयुक्त निधी उभारला आणि हे काम पुरे झाले. भारतात संस्कृतच्या अभ्यासाची स्थिती शालेय पातळीवर केविलवाणी आहे. त्रिभाषासूत्राने शाळांमधून संस्कृत जवळजवळ हद्दपार केल्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही संस्कृतची पीछेहाट झाली आहे. एकीकडे संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आणि राष्ट्रीय संस्कृत संस्थान यासारख्या संस्कृतच्या अध्ययनाची आणि संशोधनाची सोय असणाऱ्या दहा परिसर असलेल्या विद्यापीठाची, तसेच दिल्ली, तिरुपती इ. ठिकाणी राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठांची स्थापना करून शासनकर्ते संस्कृतच्या विकासावर भरपूर निधी खर्च करीत आहेत; तर दुसरीकडे अभ्यासातील गुणवत्तेचा दर्जा घसरत आहे असे चित्र दिसत आहे. भारतासारख्या राष्ट्रात शिक्षणाचा अर्थार्जनाशी थेट संबंध जोडल्यामुळे 'सुजाण पालक आपल्या पाल्याला संस्कृतच्या वाटेला जाऊ देत नाहीत. प्रतिक्षणी ज्ञानाची नवनवीन क्षितिजे विस्तारत असताना वर्तमानातील व्यवहाराशी सांगड घालता न आल्यामुळे व्यावहारिक मूल्य शून्य असणाऱ्या संस्कृतसारख्या विषयाचा ध्यास कुणी घेत नसेल तर त्यात गैर काहीच नाही असे आपाततः वाटणे स्वाभाविक आहे. त्यात भरीला संस्कृत ही विशिष्ट धर्माची, वर्णाची, मनुस्मृतीसारख्या ग्रंथांची भाषा तर आहेच, शिवाय ती अतिशय अवघड आहे, संस्कृत म्हणजे घोकंपट्टी, यांसारखे कितीतर अपसमज - काही कळतनकळत तर काही जाणूनबुजून- समाजात बिंबवले जात आहेत. वर वर्णन केलेले संस्कृतचे सर्वसामान्य जाणिवेपलीकडचे स्वरूप कळल्यानंतर हे अपसमज दूर व्हायला मदत होईल असा विश्वास वाटतो. आता शेवटचा मुद्दा. आज संस्कृत कुठल्याही समाजघटकाची बोली नसताना, तिला व्यावहारिक मूल्य नसताना, बरेचसे संस्कृत वाङ्मय कालबाह्य झालेले असताना ती का शिकायची? या प्रश्नाची काही उत्तरे खरे तर तिच्या स्वरूपाच्या वर केलेल्या वर्णनात दडलेली आहेत. केवळ युरोभारतीय कुळातील नव्हे, तर कोणतीही भाषा शिकून प्रावीण्य मिळवण्याचे संस्कृत भाषा हे उपयुक्त साधन आहे. आचार्य विनोबा भावे कुराणातली आयते उच्चारातल्या बारकाव्यांसकट अस्खलित म्हणत. 'कुराणपठण कुणाकडे शिकलात?' असे विचारल्यावर ते म्हणाले, 'ही सर्व पाणिनीच्या संस्कृत व्याकरणाची किमया आहे. संस्कृत शिक्षाग्रंथांनी वर्णांच्या उच्चारणाच्या प्रक्रियेचे केलेले सूक्ष्म वर्णन वाचून पाश्चात्य अभ्यासक थक्क झाले. आजचे आघाडीचे गायक संगीतकार अजय-अतुल यांनी एका मुलाखतीत सांगितले, की शाळेत शंभर गुणांचे संस्कृत घेतल्यामुळे त्यांचे उच्चार चांगले झाले. जगातले पहिले आणि प्रगत ध्वनिशास्त्र संस्कृतात आहे. ध्वनिशास्त्रावर अनेक संस्कृत ग्रंथ असून त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास झाला तर ध्वनिशास्त्रातली नवी रहस्ये हाती लागणे अशक्य नाही. संस्कृतच्या ध्वनिमाधुर्याच्या ओढीने अनेक भाषार सिक संस्कृतकडे आकृष्ट झाले आहेत. विख्यात उर्दू कवी महंमद इक्बाल आपल्या जावेदनामा या ग्रंथात म्हणतो, "संस्कृतचा गोडवा उर्दूस कोठून येणार?” ज्या विदेशी अभ्यासकांनी हा गोडवा अनुभवला, ते तो मनात साठवून परत गेले. आमचे पालक विदेशी भाषांमधल्या गोडव्याने मोहित होऊन तो आपल्या पाल्यांना चाखवू पाहत आहेत. यामुळे काय होईल? संस्कृतचा गोडवा अनुभवण्यासाठी त्यांना विदेशी पाठवण्याची वेळ येईल! गेल्या शतकातले विख्यात प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर यांनी एकदा आपली कटू आठवण विद्यार्थ्यांना सांगितली ती अशी : दुसऱ्या महायुद्धाच्या सुमाराला ते जर्मनीत संस्कृतमध्ये पीएच. डी. करण्यासाठी गेले असताना त्यांना बऱ्याच खटापटीनंतर हिटलरची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. दीडच मिनिटाच्या त्या मुलाखतीत हिटलर त्यांना म्हणाला, "आपली विद्या शिकण्यासाठी आपला देश सोडून तुम्ही इकडे येता! मला तिरस्कार वाटतो तुमचा!” या बोलण्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. वास्तविक ते संस्कृत विद्या शिकण्यासाठी नव्हे, तर नवनवीन संशोधनपद्धती शिकण्यासाठी आणि तिथल्या सुसज्ज ग्रंथालयांचा उपयोग करून घेण्यासाठी गेले होते. संस्कृतचे अभ्यासक सर्वसाधारणपणे याच हेतूने परदेशी जातात, परंतु या पुढच्या पिढ्यांचे काय ? त्यांना भविष्यात संस्कृत शिकण्याची संधी या देशात मिळाली नाही तर ते शिकण्यासाठी परदेशी जावे लागेल! संस्कृत वाङ्मयाचा मूल्यवान नजराणा सर्वच भारतीयांसमोर खुला आहे. ललित साहित्यच नव्हे तर गणित, खगोलविज्ञान, वास्तुविद्या यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक ग्रंथ प्रकाशात येण्याची वाट पाहत आहेत. भारतीय गणितावर फ्रान्स आणि जपानसारख्या राष्ट्रांमध्ये चाललेल्या संशोधनानंतरच निवडक अंतर्नाद ३२९