पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निद्रिस्त परी सरोजा भाटे २४ जून हा या वर्षातील आषाढचा पहिला दिवस. म्हणजेच महाकवी कालिदास दिन. त्यानिमित्त संस्कृत भाषेची महती आणि भविष्यासाठी तिची उपयुक्तता सांगणारा हा विशेष लेख. भारताचे सर्वात मोठे वैभव आणि श्रेष्ठ सांस्कृतिक वारसा कोणता असे जर मला कुणी विचारले तर मी तत्काळ सांगेन – संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य आणि त्यात सामावलेले सर्व काही.” पं. जवाहरलाल नेहरू "संस्कृत भाषा कितीही प्राचीन असली तरी तिची रचना अद्भुत आहे. ती ग्रीक भाषेहून परिपूर्ण आहे आणि लॅटिन भाषेपेक्षा विस्तृत आहे. आणि या दोन्ही भाषांपेक्षा तिचे सौष्ठव अधिक दिमाखदार आहे तरीही या दोघींशी तिचे विलक्षण साम्य आहे. " वरील दोन वचने 'सुसंस्कृत' वाचकाला संस्कृतच्या गौरवशाली संपन्नतेची आठवण करून देण्यासाठी प्रारंभीच उद्धृत केली. पहिले वचन संस्कृतचे भारतातील असाधारण स्थान अधोरेखित करते, तर दुसऱ्यात तिचे जागतिक पातळीवरचे अनन्यत्व नमूद केले आहे जगभरातल्या अनेक विख्यात विद्वानांनी संस्कृतच्या अनेक आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांची नोंद वेळोवेळी घेतली आहे. मात्र सामान्य माणसाला त्यांची फारशी माहिती नसते. त्याला संस्कृत एक भाषा म्हणून माहीत असते. ती कुठल्याही समाजघटकाची बोली नसली, तरीही चलनी नोटांवर छापलेल्या पंधरा भाषांमध्ये ती दिसते. काही जणांना ती शाळेतच भेटलेली असते. सगळेच्या सगळे गुण देणारी म्हणून शालेय शिक्षण संपेपर्यंत तिची कास धरणारे काही जण असतात. हिंदूंच्या विवाह वगैरे मंगलकार्यात, तसेच पूजेअर्चेच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांमधून, प्रार्थनांमधून ती ऐकू येते तेव्हा तिचे धार्मिक पावित्र्याचे वलय लक्षात येते. कालिदास, भवभूति यांसारख्या महाकवींच्या काव्यनाटकांतून तसेच रामायण-महाभारतासारख्या आर्षकाव्यातून ती रसिक वाचकांपर्यंत, ललित लेखकांपर्यंत आणि वाड्मयाच्या अभ्यासकांपर्यंत पोचलेली असते. संस्कृत यापलीकडे खूप काही आहे भाषा, वाड्मय आणि संस्कृती या तीन घटकांना मिळून संस्कृत हे नाव आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. संस्कृतचे आगळेपण या तिन्ही रूपांत आहे भाषा म्हणून तिला अधिक - - • सर विल्यम जोन्स - जवळून जाणून घ्यायला लागले की ठळकपणे नजरेत भरते ते तिचे खानदान, जगातल्या यच्चयावत भाषांची वर्गवारी भाषाशास्त्रज्ञांनी बारा कुळांत केली आहे. युरोभारतीय (Indo-European) हे कुळ सर्वात मोठे संस्कृतचे खानदान, याच खानदानातल्या ग्रीक, लॅटिन, प्राचीन जर्मन, इटालियन इत्यादी युरोपियन भाषा संस्कृतच्या बहिणी. इकडे भारतातल्या बहुसंख्य भाषांमधली सरासरी चाळीस टक्के शब्दसंपत्ती संस्कृतमधून उचलल्यामुळे आणि हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी यांसारख्या अनेक भाषांची जडणघडणसुद्धा तिच्यासारखी असल्यामुळे भारतीय भाषांचे आजोळ संस्कृतच्या घरात, दक्षिण आशियाई राष्ट्रांमधल्या थाई, खोतानीज, जावानीज इ. भाषांमधल्या शब्दसंपत्तीवरून एक दृष्टिक्षेप टाकला तरी त्यांचे माहेर संस्कृतच्या घरात असल्याचे प्रत्यंतर येते. एकंदरीत जगातल्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येच्या भाषांशी संस्कृतची नाळ जुळली आहे बारा भाषाकुळांची वर्गवारी मांडणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांच्या मते युरोभारतीय भाषांची गंगोत्री युरोपात किंवा मध्य आशियात कुठे तरी असली पाहिजे, हे मत स्वीकारले तर संस्कृतचे जन्मस्थान भारताबाहेर होते असे मान्य करावे लागते. हे मत बहुमान्य असले तरी अलीकडे काही विद्वानांनी संस्कृतचा मुळारंभ भारतातच होता असा अभ्युपगम (गृहीतक) मांडला आहे. ध्वनिमाधुर्य हे वैशिष्ट्य मिरवणाऱ्या जगातल्या मोजक्या भाषांमध्ये संस्कृतचा समावेश होतो. स्वराघात ( accent ) हा निवडक अंतर्नाद ३२५