पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोशीसर म्हणजे 'ग्रंथसखा' असं सायुज्य नातं झालेलं आहे. पण ह्याची सुरुवात कशी आणि कुठून झाली ? श्याम जोशीसर म्हणतात, "माझे वडील साने गुरुजींच्याबरोबर काम करणारे, ते संस्कार आमच्यावर झालेले. घरात पुस्तकंच पुस्तकं. वडिलांनी त्यांची दीड हजार पुस्तकं नंतर 'डोनेट' करून यकली. हा असा वारसा माझ्याकडे आलेला, वाचनाची आवड होतीच. पण पुस्तकांच्या किमतीमुळे प्रत्येक पुस्तक विकत घेणं अशक्यच होतं. मग वाचनालयातून पुस्तकं वाचायला सुरुवात केली. पण वाचनालयातदेखील सगळी पुस्तकं मिळतील याची खात्री नसते. असलंच तर जादा अनामत रक्कम, पुस्तक आठ दिवसांत परत करा, क्लेम असल्या सगळ्या जाचक नियमांच्या अडथळ्यांची शर्यत.... तेव्हाच ठरवलं होतं, की जेव्हा केव्हा शक्य होईल, तेव्हा वाचकाला कुठलाही अडथळा न येता, त्याला वाचनानंदाचा अवीट आनंद उपभोगता येईल, असं काहीतरी करायला हवं. कारण माझीच ती गरज होती! अर्थात ते सहजासहजी शक्य होणं अशक्यच होतं. नोकरी, प्रपंच असं करताना एक वेळ अशी आली, की आम्ही भावंडं सक्षम झालो. मग वडिलांचं स्मारक म्हणून काय करता येईल, याचा विचार करताना त्यांच्या आवडीचं काम करायचं म्हणून 'निसर्ग ट्रस्ट स्थापन केला, त्यातून वृक्षारोपण, पर्यावरण असले कार्यक्रम सुरू केले. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून 'ग्रंथसखा' सुरू केलं. मिळतील ती पुस्तकं आणलीच, पण खरा प्रवास सुरू झाला तो न मिळणाऱ्या पुस्तकांसाठी गावा- आडगावांत गेलो. ध्यास एकच, दुर्मिळ पुस्तकांचा शोध घ्यायचा. एखाद्याने असं दुर्मिळ पुस्तक द्यायला नकार दिला, तर त्याला त्या पुस्तकाची झेरॉक्स तरी द्या, अशी विनंती करायची, कष्ट, दगदग, पैसा कशाकशाची म्हणून पर्वा केली नाही. वाचकाला, अभ्यासकाला 'ग्रंथसखा' कायम आधार वाटला पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे.” श्याम जोशींनी स्वप्नाबद्दल सांगितलं खरं, पण स्वप्नालापण गहिरे रंग असतात, त्याबद्दल सांगा, असं म्हणताच ते म्हणाले, “ही कधीही न शमणारी तृष्णा आहे... मी निरनिराळी ग्रंथालयं पाहत होतो, तेव्हा लक्षात आलं, ग्रंथालयात पुस्तकं आहेत, आणखी वाढतील. पण केवळ संग्रह करणं हे वाचनालयाचं उद्दिष्ट आहे काय ? वाचकाला अभिरुचिपूर्ण करणं, त्याची अभिरुची वाढवणं हे काम कुणी करायचं? त्यातून वाचनालयात वाचकाला मदत करणाऱ्या 'काउन्सिलर्स ची कल्पना पुढे आली. सुदैवाने मला तशा मेढीमॅडम, प्रधानमॅडम मिळाल्या. त्यांच्याभोवती माहिती घेण्यासाठी वाचकांचा कायम गराडा असतो. हे मला महत्त्वाचं वाटतं. वाड्मयीन घटना घडत असतात त्याला अनुसरून प्रतिसाद देणं, वाचकांना त्यासंबंधात प्रेरित करणं हेपण मला करावसं वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. कार्यक्रम केले. उदाहरणार्थ, दिवाळी अंकांची शताब्दी होती. मासिक 'मनोरंजन' हा पहिला दिवाळी अंक आहे, तो कसा होता हे वाचकांना कळायला हवं, असं २९६ निवडक अंतर्नाद सखा कतिक 'ग्रंथसखा' चे श्याम जोशी : "लेखक आणि वाचक यांच्यामधला दुवा एवढंतरी 'ग्रंथसखा'ला समाधान मिळावं, त्यासाठी माझी धडपड आहे." मला वाटलं आणि त्याच्या जोडीलाच मग दिवाळी अंकांचा एकूणच प्रवास कुठकुठल्या अंकांनी केला हेपण दाखवणं गरजेचं वाटलं. म्हणून मग 'ग्रंथसखा'तर्फे पहिल्या दिवाळी अंकापासून ते अगदी आजच्या अंकापर्यंत हे टप्पे दाखवणारं दिवाळी अंकांचं प्रदर्शन भरवलं. ते पाचपंचवीस ठिकाणी पदरमोड करून नेलं, त्यासंबंधात व्याख्यानं दिली. अशा उपक्रमांचा आणखी एक फायदा झाला. अनेकांकडे पुस्तकं मासिकं पडलेली आहेत त्यांना ती टाकवतही नाहीत आणि ठेवावीशीपण वाटत नाहीत, त्यांना माझं वाचनालय हा आधार वाटला, पुस्तकं, मासिकं अशीही मिळू लागली, "इथे हेही सांगायला हवं, की यात व्यापारी वा स्वार्थी दृष्टिकोन नाही. हे सगळं वाचकांचं आहे, आम्ही केवळ त्याचे ट्रस्टी आहोत, देखभाल करणारे आहोत. “मघाशी अनेकांकडे पडून असलेल्या पुस्तकांबाबत सांगायचं राहिलं. त्याबाबत मी 'दत्तक योजना' सुरू केली आहे. अनेक लेखकांची मुलं ही आता परदेशात आहेत वा त्यांना या गोष्टीत रस नाही. त्यांच्यापुढे प्रश्न पडतो, की त्यांच्या वाडवडिलांनी जमवलेल्या ग्रंथ आदी गोष्टींचं करावं काय? विद्यापीठं, साहित्य- परिषदा वगैरेंची पुस्तकं जमा करण्याची वा त्यांचा सांभाळ करण्याची क्षमता संपलेली आहे मला वाटतं, आपण पर्यायी व्यवस्था करायला हवी. माझ्यासंबंधात बडोद्याच्या दादूमियाँ यांनी 'धर्मभास्कर' अंकात लेख लिहिला. हा लेख प्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे यांच्या वाचनात आला. त्यांनी मला बोलावून घेतलं. सगळी माहिती घेतली आणि ते मला म्हणाले, 'माझी काळजी आता मिटली आहे. माझ्याकडची पुस्तकं, पत्रव्यवहार, अंक ह्याचं करायचं काय, हा माझ्यापुढे प्रश्न होता. हे सर्व मी 'ग्रंथसखा' ला देणार, ' "दुर्दैवाने हे बोलणं झालं आणि पिंगे दुर्धर रोगाची शिकार झाले. त्यातच ते गेले. पण हे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगून