पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केवळ वाचनालय नव्हे... रविप्रकाश कुलकर्णी साहित्यसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनालये अनिवार्य आहेत. स्वतःचे राहते घर विकून 'ग्रंथसखा रखे एक अद्ययावत ग्रंथालय उभारणारे आणि त्यामार्फत विविध साहित्यिक उपक्रम उत्साहाने राबवणारे बदलापूरचे श्याम जोशी यांच्याविषयी. मराठी वाड्मय - व्यवहार म्हटला की आलेली मरगळ, उदासीनता आणि झपाट्याने होणारी पडझड असल्याच गोष्टी सातत्याने वाचायला व ऐकायला मिळतात. त्याची ही सवय होऊन काहीच वाटेनासं झालं आहे. असं सगळं असूनसुद्धा मनाला उभारी देणाऱ्या घटना घडत असतात. प्रश्न आहे आमच्या भावाचा, सकारात्मक पाहण्याचा... आता हे मी सर्व पुन्हा एकदा का सांगतो आहे? तर बदलापूर येथे असणाऱ्या 'ग्रंथसखा' ची तुम्हांला माहिती आहे काय? श्याम जोशी हे नाव कुठेतरी कानावरून गेल्यासारखं वाटतं काय ? फाटक होय, तेच बदलापूर, जेथे एके काळी ना. गो. चाफेकरांसारखा व्युत्पन्न माणूस पुणं सोडून आला. आपल्या आईचं स्मरण म्हणून ते दरवर्षी वाङ्मयीन श्राद्ध घालत. ज्याला पुण्याहून दत्तो वामन पोतदार यांच्यापासून ते मुंबईहून न. र. यांच्यासारख्यांपर्यंतचे सगळे भिन्न प्रकृतीचे रसिक आवर्जून येत. जणू छोटसं पण उत्तम असं साहित्य संमेलनच. 'आमचा गाव बदलापूर' नावाचा ग्रंथ - ज्यात एखाद्या गावाचा सांगोपांग वेध घेतला गेला आहे, असं मराठीतील पहिलं पुस्तक लिहिणारे तेच हे ना. गो. चाफेकर, पण त्यांच्यानंतर बदलापुरातील साहित्याचं वारं पडलंच. त्यानंतर मध्य रेल्वेवरील औद्योगिक संस्कृतीमुळे गरजेपोटी वाढत, पसरणारं गाव ते बदलापूर, अशीच त्याची ओळख होत गेली... लोंढेच्या लोंढे फक्त... जगण्याच्या लढाईत स्वतःला विसरून गेलेले. कुठूनतरी कुठे चाललेले हेच दृश्य! कमी-जास्त हाच काय तो फरक. यात नवीन ते काय ? पण इथेच मला स्वतःला धक्का बसला, ज्यातून अजूनही फारसं सावरायला झालं आहे असं नाही, असं काय झालं? सांगतो गच्च भरलेल्या लोकलमध्ये श्वास घ्यायची पंचाईत, तिथे वाचताना कोण कशाला दिसणार आहे? त्यात पुन्हा दिसलंच तर कुठलंतरी सटरफटर मासिक, वा चटोर कादंबरी वाचणारा, असा सगळा प्रकार अशा वेळी एकाच्या हातात चक्क गजानन भास्कर मेहेंदळेकृत छत्रपती शिवाजी महाराज चरित्रग्रंथ! काही दृष्टिभ्रम तर नाही ना, म्हणून मग 'कुठलं हे पुस्तक?' असं विचारलं, तर पठ्ठ्यानं ग्रंथराजच पुढे केला. पान उलटून पाहिलं तर कळलं, चक्क ग्रंथालयातलं पुस्तक !! एरवी मोठ्या वाचनालयातदेखील असे संदर्भ ग्रंथ नसतात, असलेच तर 'संदर्भ' म्हणून कडीकुलुपात असतात, असा स्वानुभव असताना बदलापुरातील वाचनालयात हे पुस्तक आणि तेदेखील खुलेआम वाचकाच्या हातात! धक्क्यावर धक्के असंच सगळं 'ग्रंथसखा' वाचनालय पहिल्यांदा माहीत झालं ते असं. पण एकदा का 'ग्रंथसखा' माहीत झालं, की त्या वाचनालयाचे सर्वेसर्वा काळजीवाहू श्याम जोशी तुम्हांला माहीत होतातच. म्हणजे तुम्ही तरी त्यांना भेटता किंवा ते तरी तुम्हांला भेटायला येतात. पुढे तुमच्या लक्षात येतं 'ग्रंथसखा' हे केवळ वाचनालय नाही, तर त्यापलीकडे आणखी काही बरंच असं आहे. बदलापूरच्या पूर्वेला तेलवणे टॉवरच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये एकीकडे टेलर, दुसरीकडे चहाचं दुकान, वाणसामान अशा गर्दीत दर्शनीच मोठं आणि तेदेखील एअर कंडिशन्ड वाचनालय? अशक्य वाटणारं, पण खरोखरच समोर दिसतच असल्याने विश्वास ठेवायला लागतो. 'ग्रंथसखा'त शिरताच सगळीकडे पुस्तकंच पुस्तकं दिसतात, हे समजण्यासारखं आहे पण कुठेही कसल्याच सूचना देणाऱ्या पाट्या नाहीत, ते सोडा, ते कुणाचं आहे, याचादेखील पत्ता नाही! तुम्ही आत थेट जाता. पुस्तकं चाळू लागता. कितीही वेळ लागला तरी कुणी हटकत नाही! तुम्हांला हवं ते पुस्तक मिळत नाही, हे तुमच्या देहबोलीवरून लक्षात आलं, तर मग तुम्हांला पुस्तक मिळवून देण्याकरिता स्टाफ मदतीला येतो. पर्यायी पुस्तकंदेखील सुचवली जातात. तरी देखील तुमचं समाधान होत नाही, असं लक्षात येताच मग त्या मदतीला आलेल्या बाई म्हणतात, "आता आमचे 'सर' तुम्हांला नक्की मदत करतील." हे सर म्हणजेच इतका वेळ कुठे वाचनालयातील पुस्तकं विभागवार लाव, कुठे मासिकांचा गठ्ठा उचलून ठेव असलं काहीतरी करणारे आणि त्या स्टाफपैकीच वाटणारे गृहस्थ – श्याम जोशी सर, एके काळी ते शाळेत लोकप्रिय शिक्षक होते. त्यावेळी शिल्लक राहिलेली खूण म्हणजे - ते अजूनही 'जोशीसर' म्हणूनच ओळखले जातात. आज 'ग्रंथसखा' म्हणजे जोशीसर आणि निवडक अंतर्नाद २९५