पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठेवलं होतं. त्याप्रमाणे पिंगे यांच्या पत्नी कमलाताई, मुलगा सांबप्रसाद यांनी सर्व गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या. दोन ट्रक भरेल एवढ्या या गोष्टी होत्या. त्यातून मग 'रवींद्र पिंगे दालन' निर्माण करण्याची कल्पना सुचली. पिंगे यासंबंधात या साहित्याचं, माहितीचं वर्गीकरण करण्याचं काम सुरू आहे. पिंगे यांच्या साहित्याची सूची प्रकाशित करायची आहे. म्हणजे उद्या कुणा अभ्यासकाला रवींद्र पंगेसंबंधात अभ्यास करायचा आहे, तर त्याला 'ग्रंथसखा'ला भेट देण्याशिवाय पर्याय राहता कामा नये. "याचा एक परिणाम असा झाला, की आता इतरही लेखकांकडून, त्यांच्या कुटुंबीयांकडून विचारणा होऊ लागली आहे. त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आणखी एक योजना आहे. शांता शेळके, दुर्गा भागवत यांचं बरंच साहित्य अंकांतून विखुरलेलं आहे ते ग्रंथबद्ध करणं हे प्रकाशकाचं काम झालं. पण त्याची सूची करणं मला अपेक्षित आहे. अभ्यासकांना ते किमान झेरॉक्स करून देण्यासाठी माझी धडपड आहे. म्हणजे एकीकडे वाचकाची वाचन-अभिरुची वाढवणं, त्यासाठी त्याला साहित्य देणं, हे जसं 'ग्रंथसखा' चं काम आहे, तसंच या साहित्यिकांच्या कारकिर्दीचं 'डॉक्युमेन्टेशन' जपून ठेवणं, उपलब्ध करून देणं, हा माझा उद्देश आहे. "हे असं मी तासन्तास बोलू शकतो; कारण माझ्यासमोर माझी कामंच मला दिसतात. पण हे सगळं माझ्याकडून केव्हा आणि कसं होणार आहे? माझी तेवढी क्षमता आहे का? असा प्रश्न निर्माण होतोच. त्यासाठी २०१५ पर्यंतचं माझं 'टारगेट' तयार आहे. त्याचा कच्चा आराखडाच मी तुमच्यापुढे मांडतो. - 'द बुक युनिव्हर्सिटी' जिथे पुस्तकं मिळतीलच; पण कसं, काय, केव्हा वाचावं याचं मार्गदर्शन होईल, हे आमचं उद्दिष्ट आहे. वाचनालयं अनेक आहेत. पण त्यांची 'बुक व्हॅल्यू तपासण्याची यंत्रणा आमच्याकडे कुठे आहे? टपरीतलंपण वाचनालय, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि 'ग्रंथसखा' पण वाचनालय, असं समजून चालेल? ते निकष मांडायचे आहेत, मांडतो आहोत. याच पातळीवर वाचकाची 'इय तपासून त्याला उंचीवर कसं न्यायचं? पुस्तकांचा प्रवास दाखवणारं संग्रहालय, जिथे सगळा शब्दांचा, भाषावैभवाचा प्रवास दाखवायचा आहे 'ग्रंथसखा' ची गृहपत्रिका असेल. हा केवळ हवेतील विचारविलास नाही, तर त्याला वास्तवाचं अधिष्ठान आहे, हे त्यातून स्पष्ट होईल. 'बुक टुरिझम' करायचा विचार कुणी केला आहे का? विश्वकोश कसा आणि कुठे होतो? भाषांतराचा खजिना उपलब्ध करणारे मेहता पुण्यात बसून हे कसं काय जमवतात, हे अनेक वाचकांना जाणून घ्यावंसं वाटतं. हे सगळं प्रत्यक्ष तिथे नेऊन मला वाचकांना दाखवायचं आहे. - "असे उपक्रम अर्थातच माझ्या 'ग्रंथसखा' वाचनालयाच्या सभासदांच्या मदतीच्या जिवावरच करणार आहे. शिवाय अनेक ग्रंथप्रेमींचा मदतीचा हात पुढे येतो आहे. सगळ्या योजना भले मला एकट्याला नाही करता येणार पण काहीतरी होतीलच ना? माझी धडपड त्याच्यासाठी आहे. लेखक आणि वाचक यांच्यामधला दुवा एवढंतरी 'ग्रंथसखा'ला समाधान मिळावं, त्यासाठी माझी धडपड आहे.” श्याम जोशी ग्रंथ आणि ग्रंथालय यांबाबत बोलायला लागले, की त्यांना थांबता येत नाही. याचा अर्थ जोशीबुवांना काही अडथळे, समस्या नाहीतच का? तसं अजिबात नाही. त्या प्रतिकूल गोष्टींचे डोंगरच्या डोंगर उभे आहेत. पण त्यावर मात करायची जिद्द जोशीबुवांच्यात आहे प्रवाह्यच्या विरुद्ध जाण्याची इच्छा आहे. अशा वेळी तुम्ही-आम्ही, ज्यांना ग्रंथव्यवहारात रस आहे, आस्था आहे, ते किमान जोशीबुवांना 'आगे बद्ये, हम तुम्हारे साथ है' एवढं तरी म्हणू शकतो ना? जोशीबुवांना एवढं पाथेयदेखील पुरेसं ठरेल! ग्रंथसखा, तेलवणे टॉवर्स, त्यांच्याशी संपर्क साधू शकता बदलापूर (पूर्व), ४२१५०३ 'ग्रंथसखा' मुळे एक नवा चेहरा बदलापूरला मिळतो आहे. उद्या बदलापूरला जावंसं तुम्हांलाही वाटेल. हो ना? (ऑक्टोबर २०१०) ज्या सुंदर गोष्टींचे सौंदर्य इतरांना समजावून सांगावे लागते तिच्यावर माझा फारसा विश्वास नाही. सौंदर्याचा निर्माता सोडून आणखी कोणालातरी त्या सौंदर्याचे स्पष्टीकरण देणे जेव्हा भाग पडते तेव्हा कलावंत म्हणून तो निर्माता कोठेतरी कमी पडला आहे असे मला निश्चित वाटते. चार्ली चॅपलिन वीणेच्या तारा खूप सैल असतील तर त्यातून संगीत निघणार नाही. खूप घट्ट असतील तरीही संगीत निघणार नाही. पण त्या तारांची एक अवस्था अशीही असते जेव्हा त्या सैलही नसतात आणि घट्टही नसतात. नेमक्या त्याच बिंदूवर संगीताचा जन्म होतो. त्याचप्रमाणे भोग आणि संयम यांच्यामधली एक अवस्था असते. नेमक्या त्याच बिंदूवर जीवनाचा जन्म होतो. • आचार्य रजनीश - (दिवाळी २०१६) निवडक अंतर्नाद २९७