पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्या कथेला सुरुवात करून देतो. कधी मनातलं अधांतरी कथानक लिहीत जावं तसं सुस्पष्ट होत जातं, आपोआप. 'मौज' मधल्या संपादनाच्या कामामुळे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांचा सहवास, त्यांची विचक्षण नजर जाण, चर्चा यांमुळेही माझ्या मनातल्या काही कथांना दिशा, आकार मिळत गेला आहे. मोनिका कादंबरीकडे मी वळले आहे ते मला एक आव्हान वाटतेय अन् पेलून दाखवायचंय. पण आत्ताच त्याबद्दल बोलणं नको, संजय तू बऱ्याचदा दीर्घकथेचा घाट घालतेस. कधी कधी त्यातली काही अनुभवकेंद्रं पुरेशी explore होत नाहीत, असं माझं मोनिका : सांगते. माझी 'आधार' ही कथा. कारण या कथेनं मला प्रसन्न करणारं निर्मितीचं थकलेपण दिलं. या कथेनं मत आहे. एकुणात तुला कादंबरीलेखनाकडे वळावंसं वाटत नाही माझ्यापुढे, माझ्यातल्या लेखिकेपुढे एक आव्हान उभं केलं का? होतं. त्यातलं मामा भाच्यातल्या समलिंगी संबंधांचं नातं, हे मामाच्या दृष्टीनं एकीकडे त्याच्या कलानिर्मितीशी जोडलेलं, त्याचबरोबर त्याच्या एकटेपणाशी लैंगिक अतृप्तीशीही या नात्यामागच्या अशा अनेक पातळ्या होत्या आणि तरीही मला तो अनुभव विकल करणारा, करुण या अर्थाने, पोहोचवायचा होता. म्हणून ही कथा मला विशेष आवडलेली, ती कितपत यशस्वी ठरली, माहीत नाही.

संजय एक वाचक म्हणून आजूबाजूच्या कथालेखनाबाबत तुला काय वाटतं? मराठी कथेत नेमकं काय घडतंय? काय घडायला हवंय? मोनिका : कथा लिहिली खूप जातेय; पण अर्थवाही कथा कमी आहे. त्यात चांगली मासिकंही नाहीत. नव्या लेखकांना अनुभवाला गोष्टीचं रूप देता येतंय, पण कथेचं नाही, असं माझं निरीक्षण आहे. या लेखकांजवळ पुरेशी परिपक्व नजर नाही असंही वाटतंय. त्यामुळे अनुभवाला भिडणं, त्याचे पापुद्रे उलगडत नेणं, नि जीवनानुभवाशी त्या अनुभवाची सांगड घालणं इथे हे लेखक थोडे कमी पडतात. संजय आता तू एक ओळखली जाणारी कथालेखिका आहेस. तेव्हा तुला हा प्रश्न विचारायला हरकत नाही. तुझ्या अन् तुझ्या वडलांच्या कथेत तुला काय फरक आढळतो? तुझं नेमकं वेगळेपण काय आहे? आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगांन विचारतोय मी. मोनिका : माझ्या वडिलांनी दीर्घकथा कमी लिहिल्या माझ्या बहुतेक कथा या दीर्घकथा असतात. लघुकथा तर त्यांनाच जमली. बहुतेक वेळा म्हटलं जातं, की दीर्घकथा अवघड असते लिहायला. पण मला वाटतं, अनुभवाची तीव्रता अन् उत्कटता लघुकथेतच पकडता येते. ती मला नाही जमली. माझे वडील शब्दांसाठी खूप जागृत होते. त्यासाठी ते अडून राहत, आशयाइतकंच त्यांनी शैलीला महत्त्व दिलं. माझ्या कथेत शैलीपेक्षा कथेचा गाभा, केंद्र मला अधिक महत्त्वपूर्ण वाटतं. तो आशय तुम्ही कसा सांगता हे महत्त्वाचं असलं, तरी आशयच कमकुवत असेल तर ती कथा शैली कितीही प्रभावी असली तरी मनाची पकड घेत नाही, असं मला वाटतं. संजय तुला अनेक पुरस्कार मिळाले. कथेला मिळालेल्या मानसन्मानांबद्दल तुला काय वाटतं? अर्थात आपल्या लेखनाला मिळालेली दाद उत्साह वाढवणारी असते, हे निश्चित, मोनिका : त्याला महत्त्व नाही असंही मी म्हणत नाही, हुरूप येतो हे खरंय, पण पुरस्कारांनी लेखक मोठा- लहान ठरत नसतोच. संजय : आता एक बाळबोध वाटणारा, पण बहुतेक तू 'ते "तू सांगणं अवघड आहे असं उत्तर देशील असा प्रश्न - तुला स्वत:ला सर्वात आवडलेली तुझी कथा कोणती, अन् का? हा प्रश्न अनिवार्य गटातला आहे असं समज, संजय एक स्त्री म्हणून तुला लेखन हा आत्माविष्काराचा सर्वोत्तम पर्याय वाटतो का? मोनिका : हो. मला नेहमी वाटतं, बहुतेक गोष्टी तुम्ही साधन या अर्थानं कौशल्य, गुण, बुद्धी पणाला लावून मिळवू शकता. पण लेखकपण नाही. लेखन ही गोष्ट स्वतःला व्यक्त करणारी सर्वांगसुंदर अशी सामर्थ्यशाली गोष्ट आहे. संजय: आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे श्रेष्ठ कथेचे तुझे निकष काय आहेत? एखादी कथा चांगली आहे, असं तू केव्हा म्हणतेस? मोनिका सांगणं अवघड आहे असे निकष मुळात कोणत्याच साहित्यप्रकाराच्या श्रेष्ठतेबाबत नाही लावता येत, ही व्यक्तिसापेक्षच कला आहे. तरीही ढोबळपणे अन् प्राथमिक पातळीवर कथेबाबत असं म्हणता येईल त्या कथेनं अंतर्मुख करायला हवं. कथा संपली तरी वाचकांच्या मनाचा कब्जा तिनं घ्यायला हवा. कल्पिताच्या एका पातळीवरून जो अनुभव लेखकाच्या मनात चालू होतो त्या अनुभवाचं कल्पितपण पुसून वास्तवाशी वाचकांना नेऊन सोडायला हवं. मला वाटतं, अनुभवाकडे कोणत्या नजरेतून नि कसा लेखक पाहतो आणि त्याच्यातल्या शक्यता, स्तर, खोली तो किती संवेदनांनी अजमावतो, त्यावर ती कथा चांगली वा श्रेष्ठ ठरू शकते. इटालियन नाटककार पिरांदेलीनं म्हटलं आहे, "कधी कधी मला वाटतं, मी दुसऱ्याच कुणाचं तरी आयुष्य जगतो आहे" लेखकानं अशी त्याच्या व्यक्तिरेखांची आयुष्यं ओढून घेऊन स्वतःला खरवडत जगावं लागतं, तरच त्याचं लेखन जिवंत, श्रेष्ठ यांच्या आसपास पोहोचण्याची निदान शक्यता तरी निर्माण होते. (ऑगस्ट २००७)

निवडक अंतर्नाद २९३