पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छाप कुणाचीच नव्हती. पण ती केवळ अनुभव या पातळीवर राहिल्याने मला जमलेलीही नव्हती नीटशी जमली नव्हती म्हणण्यापेक्षा ती फसलीच होती. संजय मुळातून का लिहितेस? मोनिका : जेव्हा मला जाणीव मिळाली, की शब्दांतून आपण आपल्या नजरेला, अंतर्मनाला दिसणारं, अगदी वास्तवातलं वा कल्पनेतलं जग, माणसं, त्यांच्यातली नाती साकारू शकतो, काल्पनिक जगाला वास्तवाच्या पातळीवर नि वास्तवाला एका कल्पिताच्या पातळीवर रेखाटू शकतो, तेव्हा मला मनापासून लिहावंसं वाटलं, अजून एक जाणीव झाली, की हा एक प्रकारचा शोधच आहे. आयुष्याचा, माणसांचा एखादं बीज मनात रुजलं जातं, त्या अनुषंगाने व्यक्तिरेखा उभ्या राहतात. त्यांचे संवाद, त्यांची व्यक्तिमत्त्वं, आयुष्यं यांचा माझा मन एक शोध घेत राहतं. हा शोध चालू होतो तेव्हा एका अर्थानं मला माझाही शोध लागत असतो. माझ्यातली लेखिका माझ्यातल्या माणसाचाही शोध घेत असते. हा शोध मलाही घडवत नेतो. प्रगल्भ करतो. मला अजूनही वाह्ययचं आहे, याची जाणीव मला माझी कथा सतत देत असते, त्यासाठी मी लिहिते. दुसरं असं, की माझ्याकडून होणाऱ्या निर्मितीच्या ह्या आनंदासाठी निर्मितीतून प्रत्येक लेखकाला अपूर्व असाच आनंद मिळत असतो. पण त्या आनंदातून जे सात्त्विक समाधान लाभतं, त्या समाधानाला मी निष्ठा, भक्ती असं म्हणते. लेखन- विशेषत: माझी कथा, ही माझी निष्ठा, बांधिलकी आहे असं मी मानते. ती माझी श्रद्धा आहे आयुष्यात मी जेवढी नि जितकी स्वतःशी प्रामाणिक आहे, तितकीच माझ्या कथेशी. संजय तुझ्या बऱ्याच कथांत संगीत आहे. स्वर आहेत. आणि उपरे नव्हे, तर कित्येकदा ते कथेचा एक भाग बनून येतात. हे कसं अन् कोठून आलं? मोनिका : एक तर माझे वडील फार सुंदर गायचे. त्यांनी मला या कलेची देणगी दिली. मी स्वतः गेली अनेक वर्षं सतार वाजवते. संगीत ही अद्भुत गोष्ट आहे. समुद्रासारखी केवळ 'ही एक स्त्री असूनही, लेखिका असूनही असं धाडस दाखवते असल्या कौतुकासाठी वा कौतुकमिश्रित आक्षेपासाठी, थोडक्यात धाडसासाठी धाडस म्हणून, मी काही लिहीत नाही. मला असलं धाडस दाखवणं मान्य नाही. पटत नाही. विशाल. तुमच्या जगण्याला अर्थपूर्ण, सुंदर करणारी, तुमच्या आयुष्याला संगीताचा स्पर्श लाभलेला असेल, तर तुमचा जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोनच बदलून जातो. माझ्या कथांतून येणाऱ्या संगीतामुळे माझ्या कथांना थोडं वेगळं रूप येतं खरं,

संजय आता एक अत्यंत निर्बुद्ध वाटेलसा पण तरीही महत्त्वाचा प्रश्न. एक गृहिणी म्हणून नानाविध जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्यातलं लेखकपण कसं सांभाळतेस? याला अर्थात अनेक पैल आहेत. वेळेचं नियोजन हा अगदी साधा पैलू, पण इतरही पैलू आहेत. उदाहरणार्थ, तुला मिळणारे मानसन्मान आणि सार्वजनिक ओळख आणि नवऱ्याची त्याबद्दल आस्था/प्रतिक्रिया/समज वगैरे किंवा नातेवाइकांत तुझ्या प्रतिमेने येणाऱ्या अपेक्षा आणि अंतर... असे अनेक, एकुणातच तुझे लेखिकापण तू कौटुंबिक पातळीवर कसं मॅनेज करतेस, असा प्रश्नाचा रोख आहे मोनिका : गृहिणी आणि लेखिका या माझ्यातल्या दोन भूमिका मी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर ठेवल्या आहेत. सुदैवाने मला सासर म्हणून एक अत्यंत सुसंस्कृत घराणं मिळालं. माझ्या सासूबाई फार छान वाचत, दाद देत. माझ्या कथा ऐकत. फार अभिमान होता त्यांना नवरा अभिजित ड्ढ त्याची साथ तर फार महत्त्वाची असते. त्यानंही मला खूप घडवलं, खूप वाढत गेले मी त्याच्या सहवासात कधी कधी डोक्यात कथा घोळत असते, लक्ष कशातच नसतं, पण घरच्या जबाबदाऱ्याा झुगारून मी फक्त लेखन करणार, असं मला वागता येत नाही. मला ते पटतही नाही. संसार मांडला आहे, तर बंधनं येणारच थोडीफार आपल्या भूमिका जाणून घेऊन त्या पार पाडणं यालाही मी महत्त्व देतेच. तसं सगळं लाथाडून देऊनही वागता येतं; पण मला वाटतं, स्वतःशी प्रामाणिक असलेल्या कोणत्याही स्त्रीला सर्व झुगारून देता येत नाही. कुठेतरी ही मुक्तीही तिला असुरक्षित नि अपराधी करत असते. कुटुंब आणि करिअर ही प्रत्येक स्त्रीची ओढाताण असतेच, पण या कसरतीतूनच तिला स्वतःची ओळख पुरेशी मिळत जाते. स्वत:चा शोध घेता येतो. यातूनच तिला तिचं सामर्थ्य निवडक अंतर्नाद २९१