पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"प्रसन्न करणारं निर्मितीचं थकलेपण... जून २००७ मध्ये अंतर्नादने कथामंथन या नावाने एक कथालेखनाचे शिबीर आयोजित केले होते. त्याअंतर्गत मोनिका गजेंद्रगडकर यांची संजय जोशी यांनी घेतलेली मुलाखत. प्रास्ताविक 'भूप' या आपल्या पहिल्याच कथासंग्रहाने वाचकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मोनिका गजेंद्रगडकर या लेखिकेचा दुसरा कथासंग्रह 'आर्त' मौज प्रकाशनातर्फे लवकरच येतोय, भूपला वाचक- समीक्षकांबरोबरच बऱ्याच पारितोषिकांनीही दाद मिळाली. त्यातल्या 'नाळ' आणि 'आधार' सारख्या कथा विलक्षण ताकदीच्या आहेत आणि मोनिकाच्या अनाग्रही आणि अनिर्णायक शैलीमुळे वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात, एका निष्ठेने अन् सातत्याने कथालेखन करणारी मोनिका आपल्या वडिलांच्या, म्हणजे कै. विद्याधर पुंडलिकांच्या, कथालेखनाच्या प्रभावक्षेत्रात कधीच राहिली नाही. तिने आपल्या वाटा स्वतः शोधल्या अन् आपल्या वाटेवरून ती मनस्वीपणे चालत राहिली आहे. अंतर्नाद कथामंथन शिबिराच्या निमित्ताने मोनिकाशी मुलाखतवजा संजय : घरात साहित्याचं वातावरण होतं त्यामुळे आपोआपच तुला वाचनाची गोडी लागली का? का लहानपणी तुला इतर काही खास छंद होते? शिवाय लेखक वडील असल्याने तुझ्या वाचनाला काही शिस्त आली का? म्हणजे इतरांसारखंच तू आई-वडिलांना चोरून वगैरे वाचत होतीस का? जशा त्यावेळच्या मराठमोळ्या मुली कदाचित काकोडकर-फडके वाचत असतील किंवा हल्लीच्या इंग्रजाळलेल्या मुली मिल्स अँड बून वाचतात तसे? मोनिका : हो, घरी बऱ्याच मोठ्या लेखकांचं येणं-जाणं अन् चर्चा घडत असत. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे लेखक असणं ही वेगळी आणि असामान्य गोष्ट आहे असं जाणवलं. त्यामुळे वाचनाची गोडी वाढत गेली. पण तरी त्या काळात वाचन हा माझा मुख्य छंद नव्हता. खरा छंद होता तो म्हणजे सतार वाजवायचा आणि माझ्या वाचनाला तशी शिस्त नव्हतीच. घरात अभिजात पुस्तकं असायची नेहेमीच आणि अमुक पुस्तकंच वाचायची खरेदी करायची अशी सक्ती ही नव्हती. अर्थात फडके वगैरेंची पुस्तकंही घरात होतीच, पण त्यातला प्रणय वगैरे मला कधी विशेष आकर्षित नाही करू शकला आणि चोरून वगैरे वाचावं असं तर कधीच वाटलं २९० निवडक अंतर्नाद मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला. त्याचा हा संक्षिप्त वृत्तान्त, या मुलाखतीआधी मोनिकाच्या 'श्रद्धा' या कथेवर माझे आस्वादात्मक विवेचन आणि शिबिरार्थींची चर्चा झाली होती. त्या चर्चेत व्यक्त केलेल्या 'श्रद्धा' कथेतल्या तपशिलांबाबत विचारले असता सुरुवातीलाच मोनिकाने स्पष्ट केले, "माझ्या नात्यातल्या अनुभवावर आणि सारे तपशील साक्षेपाने गोळा करून आणि तपासूनच मी ही कथा लिहिली. " मोनिकाची कथानिष्ठा अशी विषयाच्या निवडीपासून तपशिलापर्यंत दिसत राहते, असो, मुलाखतीतला हा काही महत्त्वाचा भाग, काही प्रश्नांना तिने लेखी पाठवलेल्या सविस्तर उत्तरांचाही आधार घेऊन ही मुलाखत पुन्हा लिहिली आहे. नाही. शिवाय आमच्या घरचं वातावरण मुळात अगदी मोकळं होतं. संजय: घरी लेखनाचा वारसा असताना नेमकं कधी अन् का तुला असं वाटलं, की आपणही उरातली वादळं शमवण्यासाठी काही लिहू शकतो? आणि मुख्य म्हणजे कुठल्याही नॉर्मल लेखकाप्रमाणे तुझं पहिलं लेखन कवितेचं होतं का? आणि पहिल्या लेखनावर कुणाचे संस्कार आणि छाप होती? वडलांची का इतर कुणा लेखकाची? मोनिका : खरं सांगायचं तर मला कधी जाणवलंच नाही, की माझ्यात हा वारसा आला आहे असं मी लिहू शकते असंही, आशू, माझा भाऊ, अकाली गेल्यावर मात्र एक एकाकीपण माझ्यात दाटून येत गेलं आणि मी त्या एकाकीपणातच कविता करू लागले. अर्थात त्यात फार वैयक्तिक भावनांचं प्रगटीकरण होतं. पण पहिल्या लेखनावर, म्हणजे कवितांवर, कुणाची छाप वगैरे नव्हती. आणि पहिली 'स्पर्श' नावाची, ती लिहिली होती मी माझ्या मैत्रिणीच्या पहिल्या प्रेमावर, तीही सासरी आल्यावर लिहिलेली, त्यावेळची माझी एकाकी मनःस्थिती, दुरावलेल्या मैत्रिणी, नवं शहर... वगैरे अनुभवावर होती ती कथा, अर्थात त्या कथेवरही कथा -