पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयुष्यातील वेगवेगळ्या किंवा प्रसंगोपात्त त्यांच्या वाट्याला आलेल्या अवस्था आहेत आणि साहित्यशास्त्रीय, कामशास्त्रीय व्याख्यांची नुसती लेबले लावून त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व आपल्याला गवसणार नाही. त्यासाठी ही पारंपरिक चौकट मोडून टाकून मोकळ्याढाकळ्या दृष्टीने कालिदासाच्या वाड्मयातील फक्त नायिकांकडे नव्हे, तर सर्वच स्त्रियांकडे बघायला हवे. या सांकेतिक कल्पनांचा चक्रव्यूह फोडून बाहेर आले की प्रथम असे जाणवते की कालिदासाने चित्रित केलेली स्त्रीसृष्टी संख्या आणि वैविध्य या दोन्ही दृष्टींनी मोठी समृद्ध आहे. सारे कालिदासीय वाङ्मय एखाद्या प्रचंड मोठ्या झुंबरासारखे आहे. त्याच्या वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या लोलकांत कालिदासाच्या सर्व मानसकन्या लहान मोठ्या ज्योतींप्रमाणे पेटत्या, तेवत्या, लखलखत्या राहिल्या आहेत. कडकडीत निष्ठा आणि उग्र तपश्चर्या यांची प्रखर दाहक मूर्ती म्हणजे 'कुमारसंभवा'तली उमा अनपेक्षित आणि दारुण दुःखाघाताने क्षणभर मूर्च्छित पडणारी 'रघुवंशा' तली सीता लगोलग सावरून रामाला अतिशय परखड तेजस्वी निरोप पाठविते. परित्यागानंतर, प्रदीर्घ विरहानंतर पुन्हा त्याच मानहानीला तोंड द्यायची वेळ आली असता कोणतीही तडजोड न करता निर्धाराचे, निर्भय आत्मविश्वासाचे आणि निर्वाणीचे खणखणीत शब्द उच्चारून कायमची अंतर्धान पावते. ही सीता म्हणजे पातिव्रत्याच्या तेजाची, प्रेमबलाची परासीमाच आहे. साऱ्या चराचर तपोवनाला जीव लावणारी पोरकी मुलगी, ब्रह्मचारी कण्वाला गृहस्थाहूनही गृहस्थ बनवणारी कन्या, मैत्रिणींवर जिवाभावाने प्रेम करणारी आणि त्यांच्याकडून करून घेणारी मैत्रीण, सर्वस्व अर्पून प्रेम करणारी प्रेयसी, साशंकतेचे, दुःखाचे चरचरीत चटके अनुभवणारी परित्यक्ता, एकाकी माता आणि विलक्षण उदार क्षमाशील पत्नी - ही स्त्रीची वेगवेगळी उदात्त रूपे कालिदासाने एकट्या शकुंतलेत साकार केली आहेत. आपल्या प्रियकराचे प्रेम निरंतर लाभावे यासाठी पोटच्या मुलालाही दूर ठेवणारी, 'पझेसिव्ह' प्रेमाचा आविष्कार असणारी उर्वशी त्याने रेखाटली आहे. ईर्ष्या, मत्सर, असूया, कावेबाजपणा, अगतिकता हे सामान्य भाव कमी अधिक प्रमाणात दाखवणाऱ्या इरावती, धारिणी, काशीराजपुत्री, हंसपदिका अशाही स्त्रिया कालिदासाने रेखाटल्या आहेत. पण त्याचे बहुमत रूप म्हणजे शकुंतलेचे. शकुंतलेची भिन्न भिन्न रूपे म्हणजे स्त्रीजीवनाचा - त्यातील भाग्य आणि दुर्दशा यांसकट – एक मोठा 'पॅनोरामा'च आहे उमा, सीता आणि शकुंतला या कालिदासीय वाङ्मयाच्या झुंबरामधल्या सर्वांत तेजस्वी व डोळे दिपवणाऱ्या ज्योती आहेत. सौंदर्याची इंदुमती, स्वयंवरासाठी जमलेल्या राजांची मोठ्या चतुराईने आणि मार्मिकपणाने, मिस्किलपणाने ओळख करून देणारी सुनंदा, 'मुलांना इतकं भोगावं लागतं, तर नको ती वीरप्रसूही कीर्ती हे हळुवार स्पर्शाने जाणवून देणाऱ्या राममाता, मालविकेला सर्वतोपरी मदत करणारी आणि विमर्दसुरभि: बकुलावलिका खलु अहम् (चुरगळल्यावर अधिक सुगंधित होणारी बकुळीची माळ म्हटलं मी!) असा धीर देणारी बकुलावलिका, भारी गोड समयसूचक बोलणारी मोहक प्रियंवदा, जबाबदारीने वागणारी अनसूया, पोक्ती पुरवती प्रेमळ पण काही करू न शकणारी गौतमी, 'असं अप्सरेला न शोभण्यासारखं काय वागतेस?' असा खाकरवसा घालूनही उर्वशीला मदत करणारी थट्टेखोर चित्रलेखा, संन्यासिनी असूनही मालविकेसाठी झटणारी पंडितकौशिकी अशा विविध स्त्रियांनी कालिदासीय वाड्मयाचे झुंबर तेजस्वी झळझळीत केले आहे सारे कालिदासीय वाङ्मय एखाद्या प्रचंड मोठ्या झुंबरासारखे आहे. त्याच्या वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या लोलकांत कालिदासाच्या सर्व मानसकन्या लहान-मोठ्या ज्योतींप्रमाणे पेटत्या, तेवत्या, लखलखत्या राहिल्या आहेत. कमी-अधिक महत्त्वाच्या इतर स्त्रियाही त्यात आहेत. अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेली सुदक्षिणा, दीपशिखेसारखी तेज:पुंज उदारता, वेगवेगळे प्रसंग, अनेकविध भावभावना, देहाच्या वयाच्या वेगवेगळ्या अवस्था यांच्या कोंदणात कालिदासाने या स्त्रियांची लहानमोठी चित्र जडवली आहेत. मृदुता, प्रेम, वात्सल्य, क्षमाशीलता, दुःख, दुस्वास, ईर्ष्या, मत्सर, क्रोध, प्रौढत्व, सहनशीलता, समंजसपणा, तेजस्विता, आक्रस्ताळेपणा, निर्धार, जिद्द, लोकव्यवहाराची जाण - असे अनेक विशेष असणाऱ्या या स्त्रिया पोरकी मुलगी, लाडाकोडाची लेक, प्रणयिनी, पत्नी, माता, सासू, सवत, फणकारा असलेली मानिनी, वृत्तीने व अनुभवाने प्रौढत्व आलेली, परित्यक्त्या, ज्येष्ठ कुटुंबिनी - अशा कितीतरी नात्यांच्या संदर्भात जिवंत झालेल्या आपल्याला दिसतात, पण त्यांच्या जीवनाचे मूळ सूत्र आहे कण्वाचा उपदेश - शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः। भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः || पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुष गुरफटलेला असतो तो आपली महत्त्वाकांक्षा, प्रतिमा, स्थान, अधिकार, वर्चस्व यांच्या जंजाळात. त्यामुळे संसाराची सारी जीवघेणी धकाधकी, कुतरओढ वाट्याला येते ती बाईच्या तीमधून वाट काढताना तिला मदत करतात ते तिच्या तिच्या स्वभावानुसार व स्थानानुसार वर उल्लेखिलेले गुण, उमा, सीता आणि शकुंतला यांनी केवढी मोठी किंमत मोजली आहे हे पाहिले म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल. मुख्य नायिका असोत, उपनायिका असोत, आलेली अडचण, उभा राहिलेला प्रश्न, कोसळलेले संकट यांच्याशी संघर्ष करून • टक्कर घेऊन विजय मिळवायचा ही या स्त्रियांची वृत्तीच नाही. क्षमाशीलता, मनाचा मोठेपणा हे त्यांचे खरे बळ आहे. त्यामुळे त्या संघर्षापेक्षा आत्मविलोपाला अधिक महत्त्व देतात. पूर्ण निवडक अंतर्नाद २७५