पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांजळपणाने क्षमा मागणे हेही सोपे नसते. कारण क्षमायाचना हा पुष्कळदा एक व्यावहारिक पवित्रा असतो. (जसा अग्निमित्राचा आहे. फक्त इरावतीच्याच बाबतीत नव्हे; धारिणीच्याही बाबतीत. तो भरतवाक्यात धारिणीला म्हणतो - त्वं मे प्रसादसुमुखी भव चण्डि नित्यम्, म्हणजे पुन्हा एकदा नव्याने मालविकाग्निमित्र घडले तर तू अशीच क्षमाशील राहा.) क्षमा मागणे त्या मानाने कमी कठीण, क्षमा करणे फार फार दुर्घट, स्वतःचे मन पूर्ण निर्मळ, सात्त्विक आणि सबळ असल्याखेरीज क्षमाशीलता परवडतही नाही आणि ती खरीही ठरत नाही. शकुंतलेने दुष्यंताला केलेली क्षमा ही निर्मळ, सात्त्विक आणि सबळ मनाची क्षमा आहे, जशी दुष्यंताची क्षमायाचना पूर्णपणे प्रामाणिक आणि प्रांजळ आहे. तोही शकुंतलेचे पाय धरतो, पण ती क्षमायाचना अग्निमित्राच्या क्षमायाचनेसारखी लटकी नाही. सातव्या अंकातला दुष्यंत हा तिसऱ्या अंकातला प्रामाणिक 'आर्य' दुष्यंत आहे. शकुंतलेलाही मनापासून याचा आनंद होतो की दुष्यंताने निष्कारण आपला परित्याग केलेला नाही. मुग्धा शकुंतलेला पूर्वी अंगठीचा फार मोठा आधार होता. जीवनाच्या सत्त्वपरीक्षेत तावूनसुलाखून निघालेल्या शकुंतलेला तिची आता गरजच उरलेली नाही, कारण तिचा स्वत:वरचा विश्वास बळकट आणि तिची क्षमाशीलता पूर्ण निर्मळ आहे. सीता आणि शकुंतला या दोघींची परिस्थिती काही अंशी समान आहे. त्या गर्भवती असतानाच दोघींचाही परित्याग झाला आहे पण शकुंतलेच्या वाट्याला आलेली दुर्दशा अधिक भीषण आहे. रामाने सीतेच्या ठिकाणचा गर्भ नाकारला नव्हता. शिवाय सीता वयाने मोठी, जग पाहिलेली, आधीच दुर्दैवाचे फेरे अनुभवलेली होती, त्यात तिला वाल्मीकीच्या रूपाने स्थिर माहेर भेटले, प्रेमळ पिता भेटला, शकुंतलेला तपोवनाच्या बाहेरच्या जगाचा वाराही लागलेला नव्हता. अतिशय प्रेमळ, शीतल वातावरणात ती वाढली होती. शिवाय ती वयानेही अगदी कोवळी, जेमतेम सतरा अठरा वर्षांची पोर मनाशी मोठ्या अपेक्षांचे इमले उभारत दुष्यंताकडे आलेल्या तिला विलक्षण अपमानकारक नाही नाही ते शब्द ऐकून घ्यावे लागले. सीतेप्रमाणे तिच्याही तोंडी शब्द आले - भगवति वसुधे, देहि मे विवरम्, सीतेला तिच्या आईने आधार दिला. शकुंतला पुन्हा पोरकी झाली, पण तिलाही तिची आईं मिळाली, निमूटपणे शकुंतला तिच्याबरोबर गेली, जाताना राजाच्या मनाला जबरदस्त हादरा देऊन गेली. तिचे शब्द संपले होते. तिच्या ओंजळीत अश्रूंशिवाय काही नव्हते. स्वीकारली आणि चौदा वर्षांनंतर पुन्हा त्याच मानहानीला तोंड द्यायची वेळ आल्यावर तीही आपल्या आज्ञास्वीकाराच्या भूमिकेवर टिच्चून उभी राहिली. त्या आज्ञेची तार्किक परिणती काय होणार, ते दाखवून दिले. आपल्या शुद्धीचे प्रात्यक्षिक तिने किती वेळा करायचे आणि का करायचे? आणि ते करून तिला आता मिळवायचे तरी होते काय ? रामाने तिच्याविषयी संशय घेतला नव्हता. तिच्याविषयीचे प्रेमही त्याच्या मनात ओतप्रेत भरले होते. पण प्रजेची खात्री पटवण्याबद्दल त्याचा आग्रह होता. सीतेच्याही मनात रामाविषयी उदंड प्रेम होते. म्हणून तर लक्ष्मणाहाती पाठवलेल्या निरोपात तिने म्हटले होते भूयो यथा मे जननान्तरेऽपि त्वमेव भर्ता न च विप्रयोगः (पुढच्या जन्मी तूच मला पती मिळावास, पण विरह मात्र व्हायला नको.) "दोघेहीजण दुसऱ्याविषयीच्या प्रेमाला धक्का लागू न देता आपापल्या भूमिकेवर स्थिर राहिले. म्हणून सीतेनेही अखेरचे दिव्य केले आणि ती कायमची अंतर्धान पावली. मुले आता मोठी होती. रामाने त्यांना काहीसे जवळही घेतले होते. हे सीतेच्या भूमिप्रवेशाचे कारण असेल काय ? दुःखकारक घटनांनी त्या व्याकूळ, दुःखी जरूर होतात, पण ज्यांच्याकरवी ह्या घटना घडल्या त्या व्यक्तींना ह्या घटनांपासून त्या अलग ठेवतात. शेवटी त्या व्यक्तीही आपल्या पूर्वकर्माचे साधन आहेत हे भान त्यांच्या मनातून जात नाही. दारुण दुःखाच्या अनुभवाने सीता आणि शकुंतला दोघींचीही विभूती अधिक विस्तारली आहे, समृद्ध झाली आहे. सीता फार वेगळी वागली. रामाने केलेल्या परित्यागाच्या वेळी तिने लक्ष्मणाबरोबर अतिशय परखड, तेजस्वी संदेश पाठवला आणि लक्ष्मण दिसेनासा झाल्यावर ती गळा काढून ढसढसून रडली. पण रामाने दिलेली आज्ञा तिने शंभर टक्के २७६ निवडक अंतर्नाद - शकुंतलेचा मुलगा लहान होता. ती स्वत:देखील वयाने तरुण, जेमतेम पंचविशीतली होती. शिवाय दुष्यंतचा प्रामाणिक पश्चात्ताप तिला उलगडला आणि पटला होता. म्हणून ती पुन्हा संसारिणी झाली असेल का? निर्मळ क्षमाशीलतेमुळे तिच्या मनात कसलीही अदी किंवा पीळ राहिलेला नाही. जितक्या सहजतेने ती पहिल्या अंकात दुष्यंताची होते, तितक्याच सहजतेने ती सातव्याही अंकात त्याची राहते. सीता आणि शकुंतला या दोघींचेही आयुष्याविषयीचे निर्णय पूर्ण वेगळे आहेत. पण दोघींनीही आपल्या पतीचे सत्त्व कधीही दृष्टीआड होऊ दिलेले नाही. त्यांनी आपल्या दुःखाचा गवगवा तर केलेलाच नाही पण वाट्याला आलेले दुःख शांतपणे सोसून त्यांनी आपले बळ वाढवले आहे. (क्षमाशीलता व दुःख डिग्निटीने सोसणे म्हणजे काय हे ओरिसातील मनोहरपूरच्या ग्लॅडिस स्टेन्सने अलीकडच्या काळात दाखवून दिलेले आहे.) प्रचंड मोठ्या अशा दुःखानेही खचून न जाता, गैरसमजाची दरी उद्भवू देता, केवळ आपलेच दुःख कुरवाळणाऱ्या अपंगपणाचा स्पर्शही होऊ न देता या स्त्रिया आपल्या अबोल सत्त्वाच्या, उदार आणि व्यापक समंजसपणाच्या आधाराने आपले प्रेम टिकवतात केवढे मोठे दुःख त्यांच्या वाट्याला आले! पण ते एक मधला टप्पा म्हणून राहिले आहे या दोघीहीजणी हे दुःख स्वीकारून, पचवून त्याच्या पार होतात. दुःखाच्या आवर्तात सापडून त्या लहान होत नाहीत. दुःखकारक घटनांनी त्या व्याकूळ, दुःखी जरूर होतात, पण ज्यांच्याकरवी ह्या घटना घडल्या त्या व्यक्तींना ह्या घटनांपासून त्या अलग ठेवतात. शेवटी त्या व्यक्तीही आपल्या पूर्वकर्माचे साधन आहेत हे भान